Hindusthan Samachar
Banner 2 सोमवार, अप्रैल 22, 2019 | समय 17:33 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

अमरावती : २४ उमेदवारांसाठी २ हजार मतदान केंद्र

By HindusthanSamachar | Publish Date: Apr 17 2019 9:26PM
अमरावती : २४ उमेदवारांसाठी  २ हजार मतदान केंद्र
अमरावती, १७ एप्रिल (हिं.स.) लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्याचे मतदान उद्या, गुरुवारी होणार असून, याच टप्प्यात अमरावती लोकसभा मतदार संघातील १८ लाख ३०,५६१ मतदार आपला खासदार निवडणार आहेत. मतदानासाठी प्रशासन पूर्णत: सज्ज असल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले. अमरावती जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघाचा लोकसभा मतदार संघात समावेश होतो. लोकसभा निवडणुकीपूर्वी जाहीर झालेल्या मतदार यादीनुसार अमरावती लोकसभा मतदार संघात ९ लाख ३३४४४ पुरुष, ८ लाख ८७ हजार ८० महिला, तर ३७ तृतीयपंथी असे एकूण १८ लाख ३०५६१ मतदारांची नोंद झाली आहे. याचवेळी मतदार संघात दोन हजार मतदार केंद्र आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत ८९१८ कर्मचारी, अधिकारी कार्यरत असून, तेवढेच अधिकारी, कर्मचारी राखीव ठेवले. निवडणुकीसाठी ४ हजार बॅलेट युनिट, २ हजार कंट्रोल युनिट आणि २ हजार व्हीव्हीपॅट लागणार आहेत. ८३० बॅलेट युनिट, ४१५ कंट्रोल युनिट आणि ५७७ व्हीव्हीपॅट राखीव ठेवले आहे. मतदान प्रक्रियेसाठी ''इव्हीएम'' पोहाेचवणे, कर्मचाऱ्यांची ने-आणसाठी ६०७ वाहनं सेवेत आहेत. जिल्ह्यातील १८ मतदान केंद्र हे महिला मतदान केंद्र राहणार आहेत, तर ३७ क्रिटिकल मतदान केंद्रावर सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक केली आहे. जिल्ह्यातील काही भागात तुरळक पावसानेही हजेरी लावली आहे. त्यामुळे ईव्हीएमला गरजेनुसार वॉटरप्रुफिंग आवरण लावत आहे. मेळघाटातील अतिदुर्गम व दुर्गम मतदान केंद्रावर मंगळवारी दुपारीच ''पाेलिंग पार्टी'' रवाना झाल्या असून जिल्ह्यातील इतर पोलिंग पार्ट्या आज बुधवारी रवाना करण्यात आल्या. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image