Hindusthan Samachar
Banner 2 रविवार, अप्रैल 21, 2019 | समय 08:12 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

हायकोर्टाने कायम ठेवली बलात्काराच्या आरोपीची शिक्षा

By HindusthanSamachar | Publish Date: Apr 17 2019 8:59PM
हायकोर्टाने कायम ठेवली बलात्काराच्या आरोपीची शिक्षा
नागपूर, १७ एप्रिल (हिं.स.) नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे एका अल्पवयीन मनोरूग्ण बालिकेवर अत्याचार करणा-या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चांगलाच दणका दिलाय. या आरोपीला झालेला १० वर्षे सश्रम कारावास आणि इतर शिक्षा न्या. स्वप्ना जोशी यांच्या एकलपीठाने कायम ठेवल्या आहेत. याप्रकरणातील आरोपी विशाल ऊर्फ विलास देवमन तुमडाम (२८) हा मध्य प्रदेशातील मूळ रहिवासी आहे. घटनेच्या वेळी तो चनाखाली, ता. सावनेर येथे रहात होता. पिडीत बालिका घटनेच्या वेळी नवव्या इयत्तेत शिकत होती. पिडीता २९ जानेवारी २०१५ रोजी रात्री ९ च्या सुमारास नैसर्गिक विधीकरिता गेली होती. दरम्यान, आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणात त्याला ७ नोव्हेंबर २००७ रोजी विशेष सत्र न्यायालयाने बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये १० वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.&nbs;उच्च न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता आरोपीचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. सरकारी पक्ष आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यात यशस्वी ठरल्याचे निरीक्षण निर्णयात नोंदविण्यात आले. भारतीय संसदेने खास बालकांकरिता ‘लैंगिक अपराधांपासून बाल संरक्षण अधिनियम-२०१२’ लागू केला आहे. बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण करणे हा या अधिनियमाचा उद्देश आहे असे मत न्यायालयाने नोंदवले. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image