Hindusthan Samachar
Banner 2 रविवार, अप्रैल 21, 2019 | समय 07:38 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वेच्या आणखी दोन विशेष गाड्या

By HindusthanSamachar | Publish Date: Apr 17 2019 8:38PM
उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वेच्या आणखी दोन विशेष गाड्या
रत्नागिरी, १७ एप्रिल, (हिं.स.) : उन्हाळी हंगामात कोकणात येणाऱ्या आणि कोकणातून परत मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने आणखी दोन विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते करमळी या मार्गावर या गाड्या धावणार आहेत. 01003 /01004 ही गाडी येत्या १९ एप्रिलपासून १० मेपर्यंत दर शुक्रवारी रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता करमळीला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ही गाडी करमळीतून येत्या २१ एप्रिल ते १२ मे या कालावधीत दर रविवारी दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी रवाना होईल. मध्यरात्रीनंतर १२ वाजून २० मिनिटांनी ती मुंबईला पोहोचेल. दुसरी 01006 / 01005 या क्रमांकाची गाडी करमळीतून २० एप्रिल ते ११ मे या कालावधीत करमळीतून दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी मुंबईला पोहोचेल. मुंबईतून ही गाडी येत्या २१ एप्रिल ते १२ मे या कालावधीत दर रविवारी पहाटे १२ वाजून ४५ मिनिटांनी (शनिवारी मध्यरात्रीनंतर) सुटेल आणि दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी करमळीला पोहोचेल. या दोन्ही गाड्या जाताना आणि येताना दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि थिवी येथे थांबतील. (हिंदुस्थान समाचार)
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image