Hindusthan Samachar
Banner 2 शुक्रवार, अप्रैल 19, 2019 | समय 21:47 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

महाराष्ट्राचे प्रशांत पाटणकर व गंधाली पालांडे नेपाळच्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सामनाधिकारी

By HindusthanSamachar | Publish Date: Apr 17 2019 8:38PM
महाराष्ट्राचे प्रशांत पाटणकर व गंधाली पालांडे नेपाळच्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सामनाधिकारी
मुंबई १७ एप्रिल, (हिं.स.) : १९ ते २३ एप्रिल या कालावधीत नेपाळ खो-खो फेडरेशनने ४थी राष्ट्रीय खो-खो स्पर्धा आयोजित केली असून हि स्पर्धा यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी भारतीय खो-खो महासंघाकडे सामनाधिकारी पाठविण्याची विनंती केली होती. महाराष्ट्रातील खो-खोसाठी अत्यंत भूषणावह बाब कि महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या प्रशांत पाटणकर व गंधाली पालांडे यांची भारतीय खो-खो महासंघाने यास्पर्धेकरीता सामनाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. मुंबई उपनगर खो-खो संघटनेचे कार्यवाह, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रशांत पाटणकर हे खो-खो क्षेत्रात ३३ वर्षे कार्यरत असून सध्या भारतीय खो-खो महासंघाच्या पंचमंडळाचे ते सचिव आहेत. खो-खो पंच म्हणून त्यांना २७ वर्षांचा दांडगा अनुभव आहे. भांडूपच्या सह्याद्री विद्यामंदीर येथे ते क्रीडाशिक्षक पदावर नोकरीकरत असून श्री. सह्याद्री संघ या नामांकित खो-खो संघाचे संस्थापक प्रशिक्षक आहेत. २०१८ साली भारतीय खो-खो संघाच्या इंग्लंड दौ-यात त्यांनी सामनाधिकारी म्हणून सहभाग होता. गंधाली पालांडे या महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या सह-सचिव असून नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असलेल्या रा.फ. नाईक विद्यालय व ग्रिफीन जिमखान्याच्या खो-खो संघाच्या व्यवस्थापिका आहेत. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image