Hindusthan Samachar
Banner 2 रविवार, अप्रैल 21, 2019 | समय 07:54 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

गरीबांच्या पाच पिढ्यांची फसवणूक करणा-या नेहरू घराण्याला कोणती शिक्षा द्यायची ? - केशव उपाध्ये

By HindusthanSamachar | Publish Date: Apr 17 2019 8:20PM
गरीबांच्या पाच पिढ्यांची फसवणूक करणा-या नेहरू घराण्याला कोणती शिक्षा द्यायची ? - केशव उपाध्ये
मुंबई, १७ एप्रिल, (हिं.स.) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पाच वर्षे खोटे बोलल्याचा आरोप करणाऱ्या सचिन सावंत यांनी काँग्रेसने पाच पिढ्या गरीबी हटावचे खोटे आश्वासन दिल्याबद्दल काँग्रेस अध्यक्षांना कोणत्या चौकात शिक्षा करायची हे आधी सांगावे, असे प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज, बुधवारी दिले. यावेळी उपाध्ये म्हणाले की, सचिन सावंत यांनी मोदी यांच्यावर पाच वर्षे खोटे बोलल्याचा आरोप केला. खरे तर त्यांच्या काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांनी पाच पिढ्या गरिबी हटावचे आश्वासन देऊन पाळले नाही आणि जनतेला फसवले याबद्दलच त्यांना शिक्षा द्यायला हवी. जनतेने काँग्रेस पक्षाला आणि नेहरू घराण्याला 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिक्षा केली आहे. त्या निवडणुकीनंतर काँग्रेसला मान्यताप्राप्त विरोधी पक्ष होण्याइतक्याही जागा लोकसभेत मिळाल्या नाहीत. या निवडणुकीत काँग्रेसची अवस्था आणखी वाईट आहे. काँग्रेस अध्यक्षांनी आपला पारंपरिक मतदारसंघ सोडून पळ काढला आहे. या निराशेतूनच आता अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे असे काँग्रेस नेते भावनिक आवाहन करून स्वतःचे अस्तित्व वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी सांगितले की, नोटबंदीमुळे काळा पैसे बाळगणाऱ्यांना त्रास झाला पण सामान्य जनतेला काळ्या पैशावरील आनंद झाला. त्यामुळेच नोटबंदीनंतर झालेल्या महाराष्ट्रातील नगरपालिका – महानगरपालिका – जिल्हा परिषद निवडणुकात आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पार्टीला भरभरून आशिर्वाद दिला आणि काँग्रेसचे पानिपत केले. त्यामुळे नोटबंदीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिक्षा देऊ पाहणाऱ्या काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी काळ्या पैशावर कारवाई करणे हा गुन्हा आहे का, हे सांगावे. केशव उपाध्ये म्हणाले की, नांदेड महापालिका निवडणुकीतील यशाची टिमकी वाजविणाऱ्या सचिन सावंत यांनी हे विसरू नये की, राज्यातील सर्व 27 महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची संख्या सर्वाधिक असून इतर प्रमुख पक्षांच्या एकूण नगरसेवकांची संख्या भाजपाएवढी नाही. अनेक महानगरपालिकांमध्ये एकेकाळी राज्य करणाऱ्या काँग्रेसची अवस्था केविलवाणी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पार्टीला दोष देण्यापेक्षा आपला जनाधार का संपत आहे आणि भावनिक आवाहनांचा आधार का घ्यावा लागतो याचे आत्मपरीक्षण करावे. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image