Hindusthan Samachar
Banner 2 रविवार, अप्रैल 21, 2019 | समय 10:07 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

रत्नागिरी जिल्ह्यातील मतदान केंद्रांमध्ये बदल

By HindusthanSamachar | Publish Date: Apr 17 2019 8:21PM
रत्नागिरी जिल्ह्यातील मतदान केंद्रांमध्ये बदल
रत्नागिरी, १७ एप्रिल, (हिं.स.) : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील ३४ मतदार केंद्राच्या ठिकाणात बदल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांमधील काही केंद्रांमध्ये बदल झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. खेड विधानसभा मतदारसंघातील १०, गुहागर विधानसभा क्षेत्रात १०, चिपळूणमध्ये ४, रत्नागिरी विधानसभा क्षेत्रात १०, तर राजापूर मतदारसंघात ३ मतदार केंद्रांमध्ये बदल झाला आहे. खेड मतदारसंघात उंबरशेत, दहिवली-शेलारवाडी, पंढरी, तिसे, खेड शहर, सडवे आणि बिजघर, गुहागरमध्ये मुंबके, भोस्ते, विसापूर, साखरी बुद्रुक, घाणेखुंट, कामथे, भेलसई, धामणंद (जाधववाडी), सापिर्ली, चिपळूण मतदारसंघात गोवळकोटमधील ३ आणि असुर्डे, रत्नागिरी मतदारसंघात माभळे, कोळंबे आणि रत्नागिरी शहरातील ८, तर राजापूरमधील परुळे, पाचल आणि सौंदळ-मुसलमानवाडी येथील मतदान केंद्रे नव्या ठिकाणी असतील. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image