Hindusthan Samachar
Banner 2 शुक्रवार, अप्रैल 19, 2019 | समय 22:52 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

लोकसभेचे उमेदवार शिंदे सरकार यांचा नागरिकांच्या भेटीगाठीवर जोर

By HindusthanSamachar | Publish Date: Apr 17 2019 7:28PM
लोकसभेचे उमेदवार शिंदे सरकार यांचा नागरिकांच्या भेटीगाठीवर जोर
पुणे, 17 एप्रिल (हिं.स) लोकसभा निवडणुकीचा जसजसा दिवस जवळ येऊ लागला आहे. तसतसा उमेदवारांचा प्रचाराचा जोर वाढला आहे. पुणे शहरातील बहुजन समाज पार्टी व समाजवादी पक्ष यांच्या महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार उत्तमराव शिंदे सरकार नागरिकांच्या भेटीगाठीवर जोर देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. पुणे लोकसभेचे उमेदवार उत्तमराव शिंदे सरकार यांनी सायंकाळी कार्यकर्त्यांसमवेत शिवाजीनगर गावठाण येथील रोकडोबा मंदीर येथे जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर शिवाजीनगर गावठाणमधील मदिराजवळ उपस्थित असलेल्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी हेमंत बोरकर, जितेंद्र बहिरट व स्थानिक नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांशी संवाद साधत असताना हळूहळू पुढे जाऊन जंगली महाराज मंदीर येथे जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर मंदीरात असलेले सामाजिक कार्यकर्ते विश्वभंर चौधरी यांची भेट घेतली. मंदिरात पुणे लोकसभेचे उमेदवार उत्तमराव शिंदे सरकार यांनी विश्वभंर चौधरी यांच्याशी विविध विषयावर चर्चा करून निवडणूकीत सहकार्य करण्याचे चौधरी यांनी आश्वासन दिले. त्यानंतर पर्वती विधानसभा मतदार संघामध्ये सम्राट अशोक सेनेचे संस्थापक व अध्यक्ष विनोद चव्हाण व प्रशांत धुमाळ यांनी त्याच्या कार्यकर्त्यांसमवेत शिंदे सरकार यांचे स्वागत करून सत्कार केला. निवडणुकीत विजयासाठी सर्वातोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. गुलटेकडी येथे सायंकाळी शिंदे सरकार यांनी शहराध्यक्ष सुदीप गायकवाड यांची भेट घेऊन मार्गदर्शन केले. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image