Hindusthan Samachar
Banner 2 शुक्रवार, अप्रैल 19, 2019 | समय 22:03 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

इतर पक्षांकडून उमेदवारांची उसनवारी करावी लागते - हुसेन दलवाई

By HindusthanSamachar | Publish Date: Apr 17 2019 7:18PM
इतर पक्षांकडून उमेदवारांची उसनवारी करावी लागते - हुसेन दलवाई
पुणे, 17 एप्रिल (हिं.स) भारतीय जनता पक्षात आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात उमेदवार नसल्याने त्यांना इतर पक्षांकडून उमेदवारांची उसनवारी करावी लागत आहे. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी मधून उमेदवार भाजपमध्ये जात आहेत, यामुळे काँग्रेस स्वच्छ होत आहे, असे मत काँग्रेस प्रवक्ता हुसेन दलवाई यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी नरेंद्र मोदींच्या सभेत व्यासपीठावर उपस्थित राहून पक्ष शिस्तीचा भंग केला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी स्पष्ट केले आहे. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image