Hindusthan Samachar
Banner 2 सोमवार, अप्रैल 22, 2019 | समय 18:03 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

मद्य विक्रीचे संशयास्पद व्यवहार, पुणे जिल्ह्यात एकूण ३२६ गुन्हे दाखल

By HindusthanSamachar | Publish Date: Apr 17 2019 7:13PM
मद्य विक्रीचे संशयास्पद व्यवहार, पुणे जिल्ह्यात एकूण ३२६  गुन्हे दाखल
पुणे, 17 एप्रिल (हिं.स) मद्य विक्रीचे संशयास्पद व्यवहार झाल्याच्या आरोपावरून पुणे जिल्ह्यात एकूण ३२६ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले असून १३ दुकानांचे परवानेही तात्पुरते निलंबित करण्यात आले आहेत. निवडणुकीची आचारसंहिता लागू असलेल्या काळात मद्य विक्री करणाऱ्या दुकानांवर दैनंदिन लक्ष ठेवले जात असून काही संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्याविरुद्ध गुन्हे दाखल होतात. त्यानुसार हे गुन्हे दाखल झाले असून ज्या मद्य विक्री करणाऱ्या दुकानांमधील विक्रीचे प्रमाण अचानकपणे वाढल्याचे निदर्शनास आले. त्या १३ दुकानांचे परवाने सीमाशुल्क खात्याने तात्पुरते निलंबित केल्याची माहिती निवडणूक शाखेतर्फे देण्यात आली . हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image