Hindusthan Samachar
Banner 2 शुक्रवार, अप्रैल 19, 2019 | समय 21:46 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

निर्यातदारांना ईओडीसी कँम्पमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

By HindusthanSamachar | Publish Date: Apr 17 2019 7:15PM
निर्यातदारांना ईओडीसी कँम्पमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
पुणे, 17 एप्रिल (हिं.स) पुण्यात स्वारगेट येथील विदेश व्यापार कार्यालयाने निर्यातदारांसाठी ईओडीसी कँम्प भरविला आहे. 26 एप्रिलपर्यंत हा मेळावा सुरु राहणार आहे. तरी निर्यातदारांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी. कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर निर्यातदारांना एक्स्पोर्ट आँब्लिगेशन डिस्चार्ज सर्टीफिकेट अर्थात ईओडीसी प्रमाणपत्र देण्यात येईल. अशी माहिती विदेश व्यापार कार्यालयाचे संयुक्त महासंचालक लोकेश एच.डी. यांनी दिली. ते म्हणाले, राज्यातील पंधरा जिल्ह्यांतील निर्यातदारांसाठी हा मेळावा भरविला आहे. निर्यातदारांची 3500 प्रकरणे अद्यापही कार्यालयाकडे प्रलंबित आहेत. त्यांचा निपटारा वेळेत व्हावा याकरीता अधिकाधिक संख्येने निर्यातदारांनी मेळाव्यात सहभागी व्हावे आणि त्यांच्या व्यवहारासंबंधीची कागदपत्रे कार्यालयाकडे जमा करावीत. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image