Hindusthan Samachar
Banner 2 रविवार, अप्रैल 21, 2019 | समय 09:56 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

निर्भयपणे मतदान करा - जिल्हाधिकारी डॉ.भोसले

By HindusthanSamachar | Publish Date: Apr 17 2019 7:08PM
निर्भयपणे मतदान करा - जिल्हाधिकारी डॉ.भोसले
सोलापूर 17 एप्रिल (हिं.स) सोलापूर लोकसभा मतदार संघात उद्या, 18 एप्रिल रोजी मतदान होत असून नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे. सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या मतदानाची जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असून मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यास जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. मतदारांनीही आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यास पुढे येऊन लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करण्याचा हक्क बजावावा. मतदारांना मतदार यादीतील आपले नाव शोधण्यास अडचण येऊ नये, यासाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी सोय करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध केली असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना केल्या आहेत. मतदान केंद्र अध्यक्ष, मतदान पथकातील अधिकारी-कर्मचारी यांना सूचना देण्यात आल्या असून मतदान केंद्रावर आवश्यक तो पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. मतदानास सकाळी 7 वाजता प्रारंभ होणार असून यापूर्वी उमेदवारांने प्राधिकृत केलेल्या मतदान केंद्र प्रतिनिधींच्या उपस्थितीत अभिरुप मतदान (मॉकपोल) घेण्यात येणार आहे. एखाद्या प्रसंगी ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्यास मतदारांनी घाबरुन जाऊ नये. बिघाड झालेले मशिन 10 मिनिटात बदलून मतदानाची प्रक्रिया पुन्हा सुरळीत केली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले. सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार असून, सायंकाळी 6 वाजता जे मतदार मतदानाच्या रांगेत असतील त्यांचे मतदान झाल्यांनतरच मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही जिल्हाधिकारी यांनी सां‍गितले. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image