Hindusthan Samachar
Banner 2 रविवार, अप्रैल 21, 2019 | समय 08:04 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

अमरावती : मतमोजणी केंद्राबाबत कलम 144 लागू

By HindusthanSamachar | Publish Date: Apr 17 2019 7:10PM
अमरावती : मतमोजणी केंद्राबाबत कलम 144 लागू
अमरावती, १७ एप्रिल ( हिं. स ) अमरावती लोकसभा मतदार संघातील निवडणूकीनंतर मतमोजणी 23 मे रोजी बडनेरा रस्त्यावरील नेमाणी गोडाऊन येथे होणार आहे. या मतमोजणी केंद्रासंदर्भात जिल्हा दंडाधिकारी शैलेश नवाल यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 नुसार आदेश जारी केले आहेत. 18 एप्रिल ते 23 मे या काळात तसेच मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे आदेश लागु राहतील. त्यानुसार उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी व प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त कोणालाही केंद्राच्या 100 मीटर अंतराच्या आत प्रवेश करता येणार नाही. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या परवानगीनुसारच व्यक्तीला प्रवेश करता येईल. या केंद्राच्या 100 मीटर परिसरात कुठलिही बाह्य साधने आणण्यास विना परवानगी आणण्यास मनाई करण्यात आली आहे. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image