Hindusthan Samachar
Banner 2 शुक्रवार, अप्रैल 19, 2019 | समय 21:46 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

तरुणावर एका व्यक्तीने ऍसिड टाकून केला गोळीबार

By HindusthanSamachar | Publish Date: Apr 17 2019 7:04PM
तरुणावर एका व्यक्तीने ऍसिड टाकून केला गोळीबार
पुणे 17 एप्रिल (हिं.स) सदाशिव पेठेत घरासमोर गप्पा मारत थांबलेल्या तरुणावर एका व्यक्तीने ऍसिड टाकून गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास घडला. यात तरुणाचा चेहरा भाजला असून, पाठीला गोळी लागली. यानंतर हल्लेखोर नवी पेठेतील एका इमारतीच्या टेरेसवर पळून गेला. त्याच वेळी त्याला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही त्याने गोळीबार केला. पोलिसांनी इमारतीला वेढा घातला. तब्बल पावणेतीन तास हे थरारनाट्य सुरू होते. अखेर हल्लेखोर तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. शहराच्या भर मध्यवस्तीत घडलेल्या या गोळीबार व ऍसिड हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले. रोहित थोरात (25, रा. स्वप्नगंध अपार्टमेंट, टिळक रस्ता) असे या हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे. तर सिद्धराम कलशेट्टी (25, रा. अक्कलकोट) असे मृत हल्लेखोराचे नाव आहे. रोहित मंगळवारी रात्री नऊ वाजता त्याच्या सोसायटीच्या खाली मैत्रिणीसमवेत गप्पा मारत थांबला होता. त्या वेळी पाठीमागून आलेल्या एका व्यक्तीने अचानक त्याच्यावर ऍसिड हल्ला करून गोळीबार केला आणि तो पळून गेला. दरम्यान, सोसायटीतील रहिवासी खाली आले. त्यांनी रोहितला उचलून जवळच्याच खासगी रुग्णालयात दाखल केले. रोहितला तत्काळ सीटी स्कॅन विभागात नेऊन त्याच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर त्याच्यावर उपचारांना सुरवात करण्यात आली. रोहितच्या कुटुंबीयांसह त्याच्या मित्र-मैत्रिणींनी रुग्णालयामध्ये गर्दी केली. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image