Hindusthan Samachar
Banner 2 रविवार, अप्रैल 21, 2019 | समय 07:50 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

आंबेडकर आणि ओवेसी यांची 21 एप्रिल राेजी पुण्यात सभा

By HindusthanSamachar | Publish Date: Apr 17 2019 7:06PM
आंबेडकर आणि ओवेसी यांची  21 एप्रिल राेजी पुण्यात सभा
पुणे 17 एप्रिल (हिं.स) वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते खा. असदुद्दीन ओवेसी यांची पुण्यात सभा हाेणार आहे. रविवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी 21 एप्रिल राेजी पुण्यातील एस.एस.पी.एम.एस. च्या मैदानावर ही सभा हाेणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे पुण्याचे उमेदवार अनिल जाधव यांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात येणार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सभांना माेठा प्रतिसाद मिळत आहे. वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लाेकसभा निवडणूक लढवत आहे. वंचित बहुजन आघाडी ही भाजपाची बी टीम असल्याचा आराेप सातत्याने काॅंग्रेस, राष्ट्रवादीकडून हाेत आहे. तर वंचितचा फायदा हा भाजपलाच हाेईल असे भाजपकडून म्हंटले जात आहे. आंबेडकर हे साेलापूर आणि अकाेला या दाेन्ही मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. साेलापूरमध्ये काॅंग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे रिंगणात आहेत तर भाजपाकडून सिद्धेश्वर स्वामी उभे आहेत. आंबेडकरांना साेलापूरमध्ये विविध संघटना तसेच डाव्यांनी सुद्धा पाठींबा दिल्याने साेलापूरची निवडणूक रंगणार आहे. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image