Hindusthan Samachar
Banner 2 रविवार, अप्रैल 21, 2019 | समय 08:04 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

रत्नागिरी : पंचवीस टक्के शाळा प्रवेशासाठी ९९१ अर्ज

By HindusthanSamachar | Publish Date: Apr 17 2019 6:58PM
रत्नागिरी : पंचवीस टक्के शाळा प्रवेशासाठी ९९१ अर्ज
रत्नागिरी, १७ एप्रिल, (हिं.स.) : बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार आरटीई’च्या २५ टक्के शाळाप्रवेशासाठी जिल्ह्यातून ९९१ अर्ज सादर झाले आहेत. त्याकरिता ७७७ जागा उपलब्ध असून, लॉटरी पद्धतीने प्रवेश देण्यात येणार आहेत. आरटीईनुसार प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांना आपल्या मुलांचे प्रवेश अर्ज भरण्यासाठी ५ ते ३० मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. अशा प्रवेशासाठी राज्यात नऊ हजार १९५ शाळांमध्ये एक लाख १६ हजार ९६० जागा उपलब्ध आहेत. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ८७ शाळांमधील ७७७ जागांचा समावेश आहे. एकूण जागांपेक्षा जास्त अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रवेश निश्चित करण्यासाठी लॉटरी पद्धत वापरण्यात येणार आहे. तीनवेळा लॉटरी पद्धतीने प्रवेश निश्चित करण्यात येणार आहेत. लॉटरीसह पुढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकही आरटीई पोर्टलवर लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे. पालकांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाइल क्रमांकावर एसएमएसद्वारे कार्यवाहीची माहिती कळविण्यात येणार आहे. त्यामुळे पालकांनी अर्जात दिलेला मोबाईल क्रमांक, भरलेला अर्ज क्रमांक, पासवर्ड सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. (हिंदुस्थान समाचार)
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image