Hindusthan Samachar
Banner 2 रविवार, अप्रैल 21, 2019 | समय 08:29 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

पुणे : व्यावसायिकाचे अपहरण आणि सुटका

By HindusthanSamachar | Publish Date: Apr 17 2019 7:02PM
पुणे : व्यावसायिकाचे अपहरण आणि सुटका
पुणे 17 एप्रिल (हिं.स) व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून अपहरण केले. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण करीत सोडून देण्यात आले. मंगळवारी (दि. 16) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चऱ्होली येथे ही घटना घडली. डॉ. शिवाजी पडवळ (55,रा. धायरी) असे अपहरण करण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांची मरकळ येथे ''राठी पॉलीबॉड'' नावाची कंपनी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पडवळ हे मंगळवारी सायंकाळी त्यांच्या मोटारीतून घरी जात होते. चऱ्होली येथे आले असता आरोपींनी त्यांची मोटार अडवली. आमच्या गाडीला कट का मारला'' असे म्हणून अपहारणकर्त्यांनी डॉ. पडवळ यांच्या कारचालकाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली. त्यानंतर त्यांच्या मोटारीचा ताबा घेऊन पडवळ यांच्यासहित पळ काढला. कारचालकाने माहिती दिली असता स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेने समांतर तपास सुरु केला. दरम्यान पडवळ यांना केडगाव चौफुला येथील पंजाबी ढाब्याजवळ सोडल्याचे पोलिसांना समजले. त्यांनी तात्काळ जाऊन डॉ. पडवळ यांना ताब्यात घेतले. पडवळ यांना बेदम मारहाण करण्यात आली असून, त्यांना उपचारासाठी यवत जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांचे अपहरण कशासाठी करण्यात आले होते याबाबत दिघी पोलीस अधिक तपास करीत आहेत. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image