Hindusthan Samachar
Banner 2 गुरुवार, मार्च 21, 2019 | समय 22:00 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

18 मार्चपासून कृषी विद्यापीठात राष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान स्पर्धेचे आयोजन

By HindusthanSamachar | Publish Date: Mar 17 2019 2:53PM
18 मार्चपासून कृषी विद्यापीठात राष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान स्पर्धेचे आयोजन
अहमदनगर, 17 मार्च (हिं.स.) : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व सोसायटी ऑफ एटोमोटीव्ह इंजिनियर्स, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने तिफण-२०१९ या कृषि यंत्रे,औजारे आरेखन,उत्पादन करण्याच्या राष्ट्रीय पातळी वरील तंत्रज्ञान स्पर्धेचे महात्मा फुले कृषि विद्यापीठात १८ ते २० मार्च या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.सदर स्पर्धा ही कांदा काढणी यंत्र या विषयावर आहे.सदर स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा यांचे हस्ते होणार आहे. सदर स्पर्धेसाठी देशातील एकुण २५ महाविद्यालयांच्या २५ संघानी सह भाग घेतला आहे.स्पर्धेसाठी एकुण ५७५ विद्यार्थी व ५२ मार्गदर्शक सहभागी होणार आहेत.तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मशिन्सची गुणवत्ता तपासण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील ३० पंचांची नेमणूक करण्यात आलेली आहे. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image