Hindusthan Samachar
Banner 2 बुधवार, मार्च 20, 2019 | समय 06:29 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

माझ्यावर व्यक्तिगत टीका करून प्रश्न सुटणार आहेत का ? - अमोल कोल्हे

By HindusthanSamachar | Publish Date: Mar 17 2019 2:55PM
माझ्यावर व्यक्तिगत टीका करून प्रश्न सुटणार आहेत का ? -  अमोल कोल्हे
पुणे 17 मार्च (हिं.स) माझी उमेदवारी जाहीर होण्याआधीच माझ्यावर व्यक्तिगत टीका करण्यात आली. माझा त्यांना सरळ सवाल आहे माझ्यावर टीका केल्याने १५ वर्ष प्रलंबित असणारे प्रश्न सुटणार आहेत का ? असे अमोल कोल्हे म्हणाले. कोल्हे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज चाकणमधून केला जात आहे. त्याठिकाणी भाषण करताना अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांच्या टीकांचा आपल्या शैलीत समाचार घेतला आहे.माझ्या सारख्या शेतकरी कुटुंबातील युवकाला उमेदवारी मिळाली हे माझे भाग्य आहे असे कोल्हे म्हणाले. त्याचप्रमाणे शिरूर मतदारसंघात महत्वाचा प्रश्न म्हणून गाजलेल्या बैलगाडा शैर्यतीच्या प्रश्नाला सुद्धा कोल्हे यांनी भावनिक साद घातली आहे. आपल्या आजोबांचे संपूर्ण नाव उच्चारुण त्यांचा बैलगाडा मालक असा उल्लेख अमोल कोल्हे यांनी याप्रसंगी केला आहे. यातून त्यांनी या भागात असणाऱ्या बैलगाडा मालकांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला. शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे असा सामना होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोणाचा विजय होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image