Hindusthan Samachar
Banner 2 गुरुवार, मार्च 21, 2019 | समय 05:04 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

दलित महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी संजय चांदणेंची फेरनिवड

By HindusthanSamachar | Publish Date: Mar 17 2019 2:48PM
दलित महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी संजय चांदणेंची फेरनिवड
अहमदनगर, 17 मार्च (हिं.स.) : दलित महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकित संजय चांदणे यांची जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करुन, नुतन जिल्हा कार्यकारणी जाहिर करण्यात आली. दादासाहेब रुपवते विद्यालयात दलित महासंघाची बैठक प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे यांच्या मार्गदर्शनाखाली तर नामदेव चांदणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रारंभी केज (जि.बीड) येथे मातंग समाजाच्या आरक्षणासाठी जलसमाधी घेणार्‍या संजय ताकतोडे या युवकास श्रध्दांजली वाहण्यात आली. काशिनाथ सुलाखे यांनी दुर्लक्षीत समाज घटकातील प्रश्‍न सोडविण्यासाठी दलित महासंघाच्या माध्यमातून युवकांना संधी दिली जात असल्याचे सांगितले. जिल्हाध्यक्ष संजय चांदणे यांनी वंचित दुर्बल घटकातील समाजबांधवांचे प्रश्‍न सोडविण्याचे व त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तर यावेळी उपस्थित पदाधिकार्‍यांनी आपली मनोगते व्यक्त केली. दलित महासंघाची नुतन कार्यकारणी पुढीलप्रमाणे : महिला आघाडी जिल्हाध्यक्षा- अरुणा कांबळे, जिल्हा संपर्क प्रमुख- कडूबाबा लोंढे, जिल्हा उपाध्यक्ष- किशोर वाघमारे, उपसंपर्क प्रमुख- सलिम सय्यद,जिल्हा संघटक-निलेश चांदणे,उपसंघटक- शिवाजी बुलाखे,नगर तालुकाध्यक्ष- रफिक शेख,नगर तालुका महिला आघाडी अध्यक्षा- शोभा चांदणे,श्रीगोंदा तालुकाध्यक्ष- चंद्रकांत सकट, पारनेर तालुकाध्यक्ष- प्रविण औचिते, नेवासा तालुकाध्यक्ष- किशोर ताकवणे, पाटोदा (जि.बीड) तालुकाध्यक्ष- दत्ता वाघमारे, कर्जत तालुकाध्यक्ष- नवनाथ उकिर्डे, नगर शहराध्यक्ष- विशाल भालेराव यांची निवड करण्यात आली. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image