Hindusthan Samachar
Banner 2 बुधवार, मार्च 20, 2019 | समय 07:32 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

भरधाव कारने पोलीस शिपायाला चिरडले

By HindusthanSamachar | Publish Date: Mar 17 2019 2:51PM
भरधाव कारने पोलीस शिपायाला चिरडले
गडचिरोली, 17 मार्च (हिं.स.) आरमोरी-गडचिरोली मुख्य रस्त्यावर रात्री गस्तीवर असताना भरधाव कारस शिपिरडण्याची संतापजनक घटना काल रात्री (16मार्च) ला 1 वाजता घडली. आरमोरी-गडचिरोली मार्गावर रात्री गस्तीवर असलेल्या पोलीस शिपाई केवलराम एलोरे यांना नागपूरकडून भरधाव वेगाने येणारी स्विफ्ट डीजायर दिसली. थांबण्यासाठी हात दाखविला. मात्र,वेगात असणाऱ्या गाडीचालकाने वेग कमी न करता पोलीस शिपाई एलोरे यांना चिरडून समोरं जाण्याचा प्रयन्त केला. वाहनाच्या जबर धडकेत केवलराम एलोरे यांचा मृत्यू झाला. वाहनचालक वामन हेडाऊ याला ताब्यात घेण्यात आले आहे. वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे म्हटले जात आहे. आज सकाळी पोलीस शिपाई एलोरे यांचे पार्थिव देहाचे उत्तरीय तपासणी करुन आरमोरी पोलीस स्टेशन येथे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे,पोलीस निरीक्षक अजित राठी व इतर पोलीस कर्मचा-यांनी सलामी देऊन त्यांच्या मूळ गावी गणेशपूर येथे अंतसंस्कारसाठी पाठविण्यात आलेले आहे. (हिंदुस्थान समाचार)
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image