Hindusthan Samachar
Banner 2 बुधवार, मार्च 20, 2019 | समय 06:24 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

कोरेगाव भीमा येथील अपघातात महिलेचा मृत्यू

By HindusthanSamachar | Publish Date: Mar 17 2019 2:45PM
कोरेगाव भीमा येथील अपघातात महिलेचा मृत्यू
पुणे 17 मार्च (हिं.स) पुणे-नगर महामार्गावर कोरेगाव भीमा येथे पादचारी महिलेचा अपघातात मृत्यू झाला आहे. या महिलेला एका भरधाव वेगाने चाललेल्या ट्रकची जोरदार धडक लागुन महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिनादेवी रॉय असे मृत महिलेचे नाव आहे. गेल्या अनेक दिवसांपासुन पुणे-नगर महामार्गावरील शहरी भागात वाहतुक कोंडीची मोठी समस्या निर्माण होत आहे. या परिसरात मोठ्या संख्येने छोटे-मोठे उद्योग व्यवसाय असल्याने कामगारांची वर्दळ असते. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण मिळविण्यात वाहतूक पोलिसांना अपयश येत आहे, त्यामुळे अशा दुर्दैवी घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पुणे-नगर महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांमध्ये वाढ होत असताना आजपर्यंत अनेक जण अपघातांचे शिकार झाले आहेत. त्यामुळे अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्याची मागणी या परिसरातील नागरिक करत आहे. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image