Hindusthan Samachar
Banner 2 शनिवार, मार्च 23, 2019 | समय 13:44 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

एसबीआयचे एटीएम मशीन फोडले; चोरट्यांनी लांबवले 35 लाख रूपये

By HindusthanSamachar | Publish Date: Mar 17 2019 2:47PM
एसबीआयचे एटीएम मशीन फोडले; चोरट्यांनी लांबवले 35 लाख रूपये
पुणे 17 मार्च (हिं.स) भोसरीतील धावडे वस्ती येथील स्टेट बँकेच्या एटीएम सेंटरमधील दोन एटीएम मशीनमधील कॅश बॉक्स फोडून तब्बल ३५ लाख २६ हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. एटीएम सेंटरमधील मशीनच्या कॅश बॉक्स चोरुन नेणारी टोळी सध्या शहरात कार्यरत आहे. यापूर्वी त्यांनी पुणे शहर व पिंपरीमधील अनेक एटीएमवर डल्ला मारला आहे. मात्र, भोसरीतील या दोन एटीएम मशीनमधून आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम चोरट्यांनी लांबविली आहे. सोनाली बिर्याणी हाऊस व बारच्या शेजारी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम सेंटर आहे. त्यामध्ये दोन एटीएम मशीन आहेत. शुक्रवारी (दि. 15) रात्री अकरा ते शनिवारी सकाळी सव्वाअकराच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीनचा कॅश व्हॉल्ट हा भाग गॅस कटरने कापून एटीएम फोडले.एका मशीन मधून 20 लाख 18 हजार 400 तर दुसऱ्या मशीन मधून 15 लाख 7 हजार 700 असा एकूण 35 लाख 26 हजार 100 रुपयांची रोकड चोरून नेली. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक (गुन्हे) देवेंद्र चव्हाण तपास करीत आहेत. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image