Hindusthan Samachar
Banner 2 बुधवार, मार्च 20, 2019 | समय 06:17 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

मोहफुलाच्या दारू अड्ड्यावर धाड; आरोपीला अटक

By HindusthanSamachar | Publish Date: Mar 17 2019 2:40PM
मोहफुलाच्या दारू अड्ड्यावर धाड;  आरोपीला अटक
भंडारा, 17 मार्च, (हिं.स.) निवडणुकीचे वारे सुरु झाले असताना आता अवैध धंद्यांना सुद्धा ऊत आले आहे. भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर परिसरात उमरी नाल्याजवळ अवैध हातभट्टी लावून मोहफुलाची दारू गाळप सुरु असल्याची गुप्त माहिती भंडारा स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे घटनास्थळी धाड टाकत आरोपी आतीस थोटे (३०) याला दारू काढत असताना रंगेहात अटक केली आहे. तर दारू काढण्याकरिता वापरलेला मोहफुलाचा साडवा पोलिसांनी नष्ट केला असून एकूण १ लाख ४६ हजाराचे साहित्यही जप्त करण्यात आले. आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image