Hindusthan Samachar
Banner 2 गुरुवार, मार्च 21, 2019 | समय 21:18 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

आगामी सरकार भाजपचेच यावे; तरुणाईचा कल

By HindusthanSamachar | Publish Date: Mar 17 2019 1:11PM
आगामी सरकार भाजपचेच यावे; तरुणाईचा कल
यंदाच्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तरूणांची महत्वाची भूमिका असणार आहे. आपल्या सरकारबद्दल तरूणाईला काय वाटत हे जाणून घेण्यासाठी हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधी मेघा माने यांनी सर्व्हे केला. यात पाच वर्षांत देशाचा विकास कितपत झाला आहे, सरकारने नागरिकांचे कोणते प्रश्न सोडले आहेत, कोणत्या समस्यांना सरकारने जास्त प्राधान्य दिले पाहिजे, तरूणांना पुढचा पंतप्रधान कसा हवा यांसारख्या प्रश्नांचा समावेश करण्यात आला होता. या सर्वेक्षणादरम्यान तरूणांनी सडेतोड आणि रोखठोक उत्तरे दिली. सर्व्हेदरम्यान विविध क्षेत्रातील तरूण - तरूणींशी संवाद साधण्यात आला. सर्व्हेनुसार ८० टक्के तरूणाईचा कौल हा भाजप सरकारला तर, २० टक्के काँग्रेसला देण्यात आला आहे. अधिकतर तरूणाईने आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षला संधी द्यावी असे मत व्यक्त केले आहे. ------------------------ मी आवर्जून मतदान करतो. मतदान केल्यामुळे आपल्याला काम करत नसलेल्या उमेदवाराला बदलण्याची संधी मिळते. निवडून येणा-या उमेदवाराने नागरिकांच्या मुलभूत गरजांना प्राधान्य दिले पाहिजे. तसेच कोणत्याही कामात दिरंगाई न करता लोकहिताच्या योजना अंमलात आणल्या पाहिजेत. माझ्या दृष्टीकोनातून आदर्श नेता हा लोकांचे प्रश्न आत्मीयतेने सोडविणारा असावा. भविष्यात मी उमेदवार म्हणून उभा राहिलो तर, सर्व प्रथम भ्रष्टाचार उघडकीस आणेन. अतिमहत्वाच्या कामांना प्राधान्य देईन. नवीन योजना अंमलात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. भाजप सरकारने ६० टक्के कामे पूर्ण केली आहेत, त्यामुळे यावेळी देखील भाजपच सरकार येईल असे वाटते. प्रथमेश गांवकर (वय - २६, सॉफ्टवेअर इंजीनियर) ----------------------- मी न चुकता मतदान करते. आपण मतदान केल्यामुळे योग्य उमेदवार निवडून येतो. जे उच्च शिक्षित, तरूण -तरूणी बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी सरकारने रोजगार उपलब्ध करून द्यावा. जेणे करून युवा पिढी चुकीच्या मार्गावर जाता कामा नये. सरकारने शेतक-यांसाठी नव्या सवलती उपलब्ध करुन देवून सर्व शेतक-यांची कर्जमाफी तात्काळ मंजूर करायला हवी. निवडून येणा-या नव्या सरकारने भारतीय जवानांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी नव्या योजना आणाव्यात. काँग्रेसपेक्षा भाजपने जास्त कामे केली आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये भाजपचेच सरकार येईल. काजल सोनूले (वय - २६, अकाउंटंट) -------------------------- आपण लोकशाही तत्वानुसार चालतो त्यामुळे मतदान करुन आपला हक्क बजावणे महत्वाचे आहे. निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या प्रत्येक उमेदवाराने प्रामाणिकपणे सगळ्यांच्या समस्या सोडवाव्यात. गेल्या निवडणुकीत भाजपने जी आश्वासने दिली होती ती पूर्ण केली नाहीत. काँग्रेसनेही काहीच कामे केली नाहीत. काँग्रेस आणि भाजप यादोन्ही पक्षाने जनतेला के‍वळ आश्वासने दिली. कामे मात्र काहीच केली नाहीत. सर्व सामान्यांचे प्रश्न जलद आणि प्रभावी निर्णयाने सोडविणारा आदर्श नेता असावा. आगामी निवडणुका या EVM मशीनद्वारे घ्याव्यात असे मला वाटते. एका दिवसासाठी मला केंद्रात कोणत्या मंत्री पदावर स्थान मिळाल्यास देशात गरीबी आणि बेरोजगारी संदर्भात जे निर्णय प्रलंबित आहे त्याची योग्यरित्या तपासणी करून ठोस निर्णय घेईन. मला वाटत आगामी निवडणुकीत भाजपचेच सरकार येणार हे निश्चित आहे. श्रद्धा सोनावणे (वय - २२, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (विद्यार्थीनी) -------------------------- हो, मी मतदान करतो. १८ वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. कारण मतदान करणे ही काळाची गरज आहे. या पाच वर्षांत भाजपसरकारने काही प्रमाणात चांगली कामे केली आहेत. आरक्षण सर्वांना दिले आहे. मात्र, असे असूनही नोक-या उपलब्ध नाहीत. कित्येक उच्च शिक्षित तरूणतरूणी बेरोजगार आहेत. बेरोजगारांना रोजगार मिळाला तर ते देशाच्या विकासातही हातभार लावू शकतात. या ४ -५ वर्षांत भाजपने लोकहिताची कामे केली आहेत त्यामुळे मला असे वाटते की,२०१९ -२०२४ पर्यंत भाजपचेच सरकार येणार. भूपेंद्र सामंत ( वय - २६, कर्मचारी) ---------------------------- भारतीय नागरिक असल्यामुळे आणि योग्य उमेदवार निवडून यावे यासाठी मी आवर्जून मतदान करतो. उमेदवार हा सुशिक्षित असावा. त्याला सर्व गोष्टीचे ज्ञान असावे असे मला वाटते. भाजप सरकारने चांगली कामे केली नाही. उलट, भाजपची सत्ता आल्यापासून बेरोजगारी वाढली, असे मला वाटते. सध्याच्या घडीला देशाला खरच एका आदर्श नेत्याची गरज आहे. स्वतःचा विचार न करता देशाचा विचार करणार नेता असावा. मला एका दिवसासाठी केंद्रात कोणतेही प्रतिष्ठित पद मिळाल्यास, मी सर्व शेतक-यांची कर्जे माफ करेन. तसेच सर्वांना शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील असेन. माझ्या राज्यात जास्तीच जास्त रोजगार कसा निर्माण करता येईल यावर लक्ष केंद्रित करने. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस येणार असे मला तरी वाटते. येणा-या नवीन सरकारने ''जय जवान जय किसान'' हे घोषवाक्य लक्षात घेऊन जनतेसाठी काम केले पाहिजे. तरुणांना रोजगार निर्माण करून दिला पाहिजे. महेश कांबळे (वय - २५, डेस्कटॉप सपोर्ट इंजीनियर)- --------------------- हिंदुस्थान समाचार / मेघा माने
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image