Hindusthan Samachar
Banner 2 गुरुवार, मार्च 21, 2019 | समय 21:01 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

अन्यथा पाकिस्तानचे 6 तुकडे होतील : इंद्रेश कुमार

By HindusthanSamachar | Publish Date: Mar 16 2019 11:01PM
अन्यथा पाकिस्तानचे 6 तुकडे होतील : इंद्रेश कुमार
मुंबई, 16 मार्च (हिं.स.) भारताचा द्वेष करणे सोडून देण्यातच पाकिस्तानचे हित आहे. जर पाकिस्तानने भारताचा मत्सर करणे बंद केले नाही तर 2025 पर्यंत पाकिस्तान जगाच्या नकाशातून नाहिसा होईल. पाकिस्तानचे 6 तुकडे होण्याची शक्यता असल्याचा इशारा राष्ट्रीय मुस्लीम मंचचे संयोजक इंद्रेश कुमार यांनी आज, शनिवारी दिला. मुंबई आयोजित हिंदी विवेक मासिकाच्या दशकपूर्ती समारंभात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला आर्य प्रतिनिधीसभेचे प्रमुख मिठाईलाल सिहं, रमेश पतंगे, आचार्य डॉ. बागीश शर्मा, सुरेश यादव, वेदप्रकाश गर्ग, दिलीप करंबेळकर, अमोल पेडणेकर आणि अरुण अबरोल प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी इंद्रेशकुमार म्हणाले की, मातृभूमीच्या संदर्भात कधीही तडजोड होऊ शकत नाही. काँग्रेसने देशाला स्वातंत्र्या मिळवून दिले नसून देशाची फाळणी केलीय. पाकिस्तानला नेहरू आणि जिन्नांनी जन्म दिलाय. केवळ भारतद्वेषावर आजवरची वाटचाल करणा-या पाकिस्तानने आपल्या धोरणात बदल केला नाही तर येत्या काळात त्याचे 6 तुकडे होतील. तसेच आगामी 2025 पर्यंत पाकिस्तान जगाच्या नकाशातून नाहीसा होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. पाकिस्तानवर अधिपत्य गाजवण्याचा चीनचा हेतू आहे हे त्यांनी ओळखले पाहिजे. आर्य समाजाच्या ध्येय, उद्दिष्टांवर प्रकाश टाकताना ते म्हणाले की, समाजातील भेदभावाचे निर्मूलन, महिला शिक्षण, नारी सन्मान आणि जीवनातील शुद्धता हा आर्य समाजाचा हेतू आहे. हल्लीच्या काळात प्रामाणिचे सर्वत्र मरण असल्याचे बोलले जाते. परंतु, हा अपसमज आहे. स्वामी दयानंद सरस्वतींनी दिलेले ज्ञान आणि दाखवलेला मार्ग येणा-या पिढ्यांकडे हस्तांतरित करणे हेच आमचे लक्ष्य आहे. आपला जन्म खंडित भारतात झाला असला तरी मृत्यू अखंड भारतात व्हावा त्यासाठी सर्वांनी संकल्पबद्ध होण्याची गरज इद्रेशकुमार यांनी व्यक्त केली. तसेच या संकल्पाच्या पूर्ततेपर्यंत अविरत प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. जगातील बहुतेक देशांची दोन नावे आहेत. परंतु, आर्यवर्त, भारत, हिंदुस्थान, इंडियन आणि हिंदुत्व हीच आमची खरी ओळक आहे. राष्ट्रीयत्व आणि मानवता हे भारतीयत्वाचे समानार्थी शब्द आहेत. हेच शाश्वत सत्य असून त्याचे जनत ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image