Hindusthan Samachar
Banner 2 गुरुवार, मार्च 21, 2019 | समय 05:46 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

‘सोशल मिडीया’तील प्रचारावरही पोलिसांचे लक्ष- मनोट पाटील

By HindusthanSamachar | Publish Date: Mar 16 2019 9:12PM
‘सोशल मिडीया’तील प्रचारावरही पोलिसांचे  लक्ष- मनोट पाटील
सोलापूर 16 मार्च (हिं.स.) - लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष, उमेदवार यांच्याकडून सोशल मिडीयाचा वापर मोठ्या प्रमाणावर होणार आहे. सोशल मिडीयातून होणाऱ्या प्रचारातून कोणाच्याही भावना दुखावल्या जावू नये, यासाठी सोशल मिडीयावरील प्रचारावर सायबर सेलचे लक्ष राहणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले की, व्हॉट्सअप, व्टिटर, फेसबुक, इंन्स्टाग्राम आणि गुगल सारख्या समाजमाध्यमांद्वारे होणा-या प्रचारावरही पोलीसांचे लक्ष राहणार आहे. जातीय तेढ निर्माण करणारा, धार्मिक भावना दुखावणारे, गुन्हेगारी स्वरुपाचे मेसेज फॉरवर्ड करु नये. असा मेसेज फॉरवर्ड झाल्यास व्हॉट्सअप गृप ॲडमिनवर गुन्हा दाखल करण्यात येऊन कायदेशीर कारवाई केली जाईल. सुमारे 325 व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पोलीस विभागाचे अधिकारी - कर्मचाऱ्यांचा समावेश असून यांच्यामार्फतही सोशल मिडियावरील प्रचारावर देखरेख ठेवली जाणार आहे. तसेच निवडणूक कालावधीत सोशल मिडियावर येणारे राजकीय संदेश सरकारी अधिकारी - कर्मचाऱ्यांनी फॉरवर्ड करु नयेत, याची दक्षता घ्यावी. लोकसभा निवडणुक काळात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. प्रचार काळात राजकीच पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. पक्षांनी प्रचारासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या परवानग्यासाठी मुदतीत अर्ज करावेत. परवानगीसाठी आलेल्या अर्जाची छाननी करुन परिपूर्ण असलेला अर्ज स्वीकारला जाईल, असे पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले. लोकसभा निवडणूक कालावधीत अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी आणि शेजारील सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद जिल्ह्यांशी आणि विजापूर व गुलबर्गा या जिल्ह्याशी समन्वय राखण्यासाठी बॉर्डर मिटिंग घेण्यात येत आहे. तसेच या जिल्ह्याच्या सीमेवर संयुक्त नाका तपासणी पथकामार्फत तपासणी केली जाणार असल्याचे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. राजकीय पक्ष व उमेदवारांनी कोणतेही होर्डिग, बॅनर विनाअनुमती लावल्यास आचासंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल केला जाईल. निवडणूक कालावधीत परवान्यावरील शस्त्रे जमा करण्याबाबत संबंधितांना सूचित केले असून त्यांच्याकडील शस्त्रे जमा करुन घेण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image