Hindusthan Samachar
Banner 2 शनिवार, मार्च 23, 2019 | समय 14:01 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

प्रियंका गांधी घेणार नागपुरात सभा

By HindusthanSamachar | Publish Date: Mar 16 2019 8:22PM
प्रियंका गांधी घेणार नागपुरात सभा
नागपूर, 16 मार्च (हिं.स.) नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी नागपुरात सभा घेणार आहेत. आगामी 4 किंवा 6 एप्रिल रोजी ही सभा होणार असल्याची माहिती पटोले यांनी आज, शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पटोले यांनी नितीन गडकरी आपले ज्येष्ठ बंधू असल्याचे सांगत भाजपवर टीकास्त्र सोडले. भाजपच्या काळात नागपूर मिहानमध्ये एकही नविन उद्योग आला नाही. तसेच मुख्यमंत्र्यांनी नागपुरातील मिहानची जागा अत्यल्प दराने रामदेव बाबाच्या कारखान्याला दिल्याचा आरोप पटोले यांनी केला. दरम्यान खैरलांजी प्रकरणाशी आपला काहीच संबंध नसून दोषींवर कारवाई व्हावी अशी आपली मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image