Hindusthan Samachar
Banner 2 गुरुवार, अप्रैल 25, 2019 | समय 03:26 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

अल्पवयीन मुलींवर बलात्कार, खून करणा-यांवर कठोर कारवाई करावी - आ. डॉ. नीलम गो-हे

By HindusthanSamachar | Publish Date: Dec 8 2018 9:50PM
अल्पवयीन मुलींवर बलात्कार, खून करणा-यांवर कठोर कारवाई करावी - आ. डॉ. नीलम गो-हे
मुंबई, ८ डिसेंबर (हिं.स.) : अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना उपनेत्या आ. डॉ. नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. डॉ. गो-हे यांनी पत्रात म्हटले आहे की, पुणे शहरातील धायरी येथे गारमाळ परिसरात गुरुवारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलींव आरोपी नितीन दामोदरने घरी कुणी नसलेले पाहून पीडितेवर बलात्कार करून तिचा गळा दाबून हत्या केली. पीडिता ११ वीला महाविद्यालयात शिकत होती. आई-वडील मोलमजुरीचे काम करीत होते. आई-वडील कामाला गेलेले पाहून व तिचा भाऊ शाळेत गेलेले पाहून नराधम नितीनने पीडितेवर लैंगिक अत्याचार करून बलात्कार केला. सायंकाळी भाऊ शाळेतून घरी आल्यावर बहिणीला बेशुद्ध अवस्थेत पहिले. भावाने तिला उठवू पाहता, उठत नसल्याने आई-वडिलांना फोन करून बोलवून घेतले. त्यांनी जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शवविच्छेदनात तिच्यावर बलात्कार करून गळा आवळून खून करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले. अशा घटना वारंवार समाजात घडत असतील तर समाजात मुली सुरक्षित कसे राहणार. अश्या प्रकरणांना कुठेतरी समाजात आळा बसला पाहिजे. अशा घटनांना वाचा फोडणे गरजेचे आहे. यासाठी आरोपीला कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. जेणे करून अशा घटनांची समाजात पुनरावृत्ती होणार नाही. या घटनेबाबत मी चिंता व्यक्त करीत असुन, या प्रकरणात पुढील मागण्या करत आहे. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करून त्याला जामीनास कसूर विरोध करावा, सदर खटला हा द्रुतगती न्यायालयात चालवावा तीन महिन्यात निकाल लागावा अशी अपेक्षा आहे, नराधमावर गंभीर स्वरूपाचे कलमे लावुन आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी. जेणे करून अशा घटनांची समाजात पुनरावृत्ती होणार नाही. अशा प्रकारच्या वर्तनाचा संशय आल्यास पोलीस व महिलासंस्थाची मदत नागरिकांनी जरुर घ्यावी असे वाटते, पीडित मुलीच्या कुटुंबियांना शासनाच्या मनोधर्य योजने अंतर्गत मदत मिळावी व संरक्षण मिळावी, अशा मागण्या शिवसेना उपनेत्या आ. डॉ. नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image