Hindusthan Samachar
Banner 2 गुरुवार, फरवरी 21, 2019 | समय 07:40 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

मुंबईकरांच्या तक्रारी घेऊन एमईआरसीच्या चौकशी समितीकडे जाणार – आ. आशिष शेलार

By HindusthanSamachar | Publish Date: Dec 8 2018 9:31PM
मुंबईकरांच्या तक्रारी घेऊन एमईआरसीच्या चौकशी समितीकडे जाणार – आ. आशिष शेलार
मुंबई, ८ डिसेंबर (हिं.स.) : मुंबई उपनगरात वीज वितरण करणाऱ्या अदानी इलेक्ट्रिकसिटी या कंपनीकडून नियमित वीज दरापेक्षा वाढीव दराने बिले आकारली आहेत तसेच रीडिंग न घेताच बिले आकारण्यात आली आहेत अशी तक्रार करून या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी जी आम्ही केली एमईआरसीने मान्य केली आहे. आमच्या लढ्याला इथपर्यंत यश मिळाले असून हा प्रश्न पूर्णतः निकाली निघावा म्हणून मुंबईकरांच्या तक्रारी घेऊन आपण स्वतः आता एमईआरसीच्या चौकशी समिती समोर जाणार आहे, अशी माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी दिली. मुंबई उपनगरात वीज वितरण करणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटी लिमिटेड या कंपनीने मुंबई उपनगरातील वीजग्राहकांना नियमित दरापेक्षा वाढीव दराने वीज बिले आकारली आहेत तसेच प्रत्यक्ष मीटर रीडिंग न घेता सरासरीचा विचार करून विज बिल आकारणी आहेत अशा असंख्य तक्रारी येऊ लागताच सर्वात प्रथम आ. शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची तातडीने दखल घेऊन या प्रकरणी चौकशी करावी असे निर्देश ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले. त्यानुसार सरकारने एमईआरसीकडे जाऊन ग्राहकांच्या तक्रारी मांडल्या. एमईआरसी ही सर्व माहिती ग्राह्य धरून या प्रकरणी सखोल चौकशी करण्या साठी द्विसदस्यीय समिती गठीत केली आहे. यामुळे भाजपने मागणी केलेल्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या आहेत. मुंबईकरांसाठी सुरू केलेल्या लढ्याला इथपर्यंत यश आले आहे त्यामुळे मुंबईकरांना न्याय मिळेल याचे समाधान वाटते आहे. मात्र अजून ही लढाई संपलेली नाही. त्यामुळे त्याचा यापुढे पाठपुरावा करतच राहणार आहोत, असे आ. शेलार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे आता ज्या ग्राहकांना वाढीव बिले आली आहेत आहेत तसेच सरासरीने बिले आकारण्यात आली आहेत अशा सर्व तक्रारी संकलित करून ही एकत्रित माहिती घेऊन आपण स्वतः नियामक आयोगाकडे जाऊन ही माहिती आयोगाच्या चौकशी समिती कडे मांडू असे आज आमदार आशिष शेलार यांनी सांगितले तसेच त्यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना वीज ग्राहकांच्या अशा तक्रारी संकलित करा असे निर्देश दिले आहेत. दरम्यान मुंबई उपनगरातील ज्या वीज ग्राहकांना अशा प्रकारची वाढीव व अन्यायकारक बिले आली आहेत त्यांनी आपापल्या विभागातील भाजप पदाधिकाऱ्यांकडे आपली माहिती द्यावी, असे आव्हानही आ. शेलार यांनी मुंबईकरांना केले आहेत. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
चुनाव 2018
image