Hindusthan Samachar
Banner 2 गुरुवार, अप्रैल 25, 2019 | समय 04:20 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

महामार्गावर उभारणार हेलिपॅड- नितीन गडकरी

By HindusthanSamachar | Publish Date: Dec 8 2018 9:18PM
महामार्गावर उभारणार हेलिपॅड- नितीन गडकरी
नागपूर, 08 डिसेंबर (हिं.स.) देशात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रस्ता अपघातात 5 टक्क्यांनी घट झाली आहे. रस्ता अपघातातील जखमींच्या मदतीसाठी महामार्गावर हेलिपॅड उभारण्याचा प्रस्ताव आहे. असे झाल्यास अपघातग्रस्तांची मदत आणि अपाघातातील ब्रेनडेड रूग्णांचा अवयदानाचे काम झटपट होऊ शकेल असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज, शनिवारी नागपुरात व्यक्त केले. ‘माय मेडिकल मंत्रा’च्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्यानिमित्तान अवयवदात्याच्या कुटुंबाचा गडकरींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गडकरी यांच्या निवासस्थानी हा छोटेखानी कार्यक्रमात पार पडला. याप्रसंगी गडकरी म्हणाले की, महामार्गावरील ‘हेलिपॅड’साठी टाटा ट्रस्ट व जर्मनीच्या एका कंपनीने मदत करण्यास पुढाकारही घेतला आहे. वाहन परवाना यावर असलेल्या ‘चीप’वरही आता अवयवदानासाठी इच्छुक असणाऱ्या वाहनचालकांची नोंद असणार आहे. यामुळे अघटित घटना घडल्यास अवयवदानासाठी त्याची मदत होऊ शकेल. असह्य दु:खात असताना स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय अनेक कुटुंब घेत आहेत. त्यांच्या या संयम आणि मानवतावादी भूमिकेमुळेचे अवयवदानाचा टक्का वाढत असल्याचे गडकरी यांनी सांगितले. यावेळी अवयवदानात उल्लेखनीय कार्य करणारे बॉम्बे हॉस्पिटलच्या नेफ्रालॉजी विभागाचे प्रमुख डॉ. श्रीरंग बिच्छू, ‘झोनल ट्रान्सप्लान्ट को-ऑर्डिनेशन सेंटर’च्या (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. रवी वानखेडे, झेडटीसीसीच्या कॉर्डिनेटर वीणा वाठोरे, डॉ. हेमंत भालेकर व डॉ. ऋषी अंधारकर यांचा गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर अवयवदात्यांच्या कुटुंबीयांना मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image