Hindusthan Samachar
Banner 2 गुरुवार, अप्रैल 25, 2019 | समय 15:53 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

शिर्डीहुन दर्शन घेऊन निघालेल्या भाविकांची बस उलटली, तिघांचा मृत्यू

By HindusthanSamachar | Publish Date: Dec 8 2018 9:07PM
शिर्डीहुन दर्शन घेऊन निघालेल्या भाविकांची बस उलटली, तिघांचा मृत्यू
नाशिक, ८ डिसेंबर (हिं.स) : शिर्डी येथून साईबाबा यांचे दर्शन घेऊन निघालेल्या भाविकांना घेऊन मुंबईकडे नाशिकमार्गे जाणारी खासगी बस महामार्गावर इगतपुरी जवळ उलटली. बसचालक ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना त्याचा बसवरील ताबा सुटला आणि बस दुभाजकावर आदळून उलटली. हा अपघात संध्याकाळी सहा वाजता घडला. या भीषण अपघातात तीन भाविक जागीच ठार तर वीसहुन अधिक भाविक जखमी झाले आहे. शिर्डी येथे दर्शन घेऊन नाशिकवरून दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास भाविक मुंबईकडे जात होते. मात्र नाशिकवरून सुमारे पंचवीस किलोमीटरवर घोटी अगोदरच पाडळी गावाच्या शिवारात खासगी बस (MH 01 CV9675) वाहनचालकाचा ताबा सुटल्याने उलटली. या अपघातात तीन भाविकांचा मृत्यू, तर वीसहुन अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image