Hindusthan Samachar
Banner 2 बुधवार, मार्च 20, 2019 | समय 05:33 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

भाजपला सत्तेतून बाहेर खेचा - खा. अशोक चव्हाण

By HindusthanSamachar | Publish Date: Nov 10 2018 8:12PM
भाजपला सत्तेतून बाहेर खेचा -  खा. अशोक चव्हाण
मुंबई / नांदेड, 10 नोव्हेंबर (हिं.स) : विश्वासघातकी,जुलमी व भ्रष्ट केंद्र आणि राज्य सरकारला सत्तेतून बाहेर खेचण्यासाठी काँग्रेस पक्षाने जनसंपर्क अभियानाची सुरुवात केली असून राज्यव्यापी अभियानाचा प्रारंभ माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते नांदेडमधून आज, शनिवारी 10 नोव्हेंबर रोजी करण्यात आला. यावेळी खा.अशोकराव चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारवर चौफेर हल्ला करत हे जनविरोधी सरकार सत्तेतून बाहेर खेचा असे आवाहन केले. तसेच खा.अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस आपल्या घरी या अभियानांतर्गत प्रभाग क्र. 8 मधील अनेक मतदारांच्या घरी जावून त्यांच्या भेटी घेतल्या व पक्षाला मतदानासह भरीव आर्थिक मदत करा असे आवाहन केले. त्यांच्या आवाहनास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिवाजीनगर येथील गड्डम कॉम्प्लेक्समध्ये जनसंपर्क अभियानासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी खा.अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसजणांना संबोधित केले. यावेळी बोलताना खा.चव्हाण पुढे म्हणाले की, युपीए व एनडीए या दोन सरकारची तुलना केली असता युपीए सरकार कामामध्ये सरस असल्याचे सहज दिसते. युपीएच्या काळात 5 लाख 30 हजार नवीन प्राथमिक शाळा सुरु करण्यात आल्या. तर मोदी सरकारने मागील दोन वर्षा 43 हजार शाळा बंद केल्या आहेत. शिक्षणावर युपीएच्या काळात 4.57 टक्के तर एनडीएच्या काळात 3.4 टक्के इतका खर्च केला आहे. युपीएने 60 हजार कोटी रुपयांचे शेतकर्‍यांचे कर्ज माफ केले याचा फायदा देशातील 3 कोटी शेतकर्‍यांना मिळाला तर एडीएच्या काळात शेतकर्‍यांची कर्ज माफी झाली नाही. युपीएच्या काळात कृषी विकास दर 3.84 टक्के,एनडीएच्या काळात केवळ 1.83 टक्के इतका राहिला आहे. ग्रामीण मजुरी वृध्दीदर युपीएच्या काळात 19.66 टक्के तर एडीएच्या काळात 3.6 टक्के, युपीएच्या काळात इंदिरा आवास योजनेअंतर्गत 28.6 लाख तर एनडीएच्या काळात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 16.66 लाख घरांचे बांधकाम करण्यात आले. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे भाव कमी असतानासुध्दा सरकारने अबकारी कर वाढवून पेट्रोल आणि डिझेलचे भाव आकाशाला नेऊन ठेवले आहेत. हे सरकार सर्वार्थांने जनविरोधी असून या सरकारला सत्तेतून खाली खेचण्याची आता वेळ आली आहे. काँग्रेस पक्षाने जनसंघर्ष ते जनसंपर्क असा आंदोलनाचा व अभियानाचा टप्पा पार केला आहे. राज्यातील प्रत्येक घरामध्ये जावून काँग्रेसची विचारधारा त्यांच्यापर्यंत पोहचविण्याचा जनसंपर्क अभियानाचा उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image