Hindusthan Samachar
Banner 2 गुरुवार, जनवरी 24, 2019 | समय 01:09 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

नागपुरात उभारली रायगड किल्ल्याची प्रतिकृती

By HindusthanSamachar | Publish Date: Nov 10 2018 7:35PM
नागपुरात उभारली रायगड किल्ल्याची प्रतिकृती
नागपूर, 10 नोव्हेंबर (हिं.स.) दिवळीत साकारल्या जाणारया किल्ले प्रतिकृतींतर्गत नागपुरातील संती गणेशोत्सव मंडळाने यंदा छत्रपतींच्या रायगडची भव्य प्रतिकृती साकारली आहे. या नेत्रदीपक किल्ल्याचे व जवळपास देशातील 250 किल्ल्यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचा रविवारी 11 नोव्हेंबर रोजी विजयराव देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. यावेळी श्रीमंत मुधोजी राजे भोसलक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठयांच्या पराक्रमी साक्षीदार असलेल्या गडकिल्ल्यांचे येणा-या पिढीला स्मरण व्हावे या उदात्त हेतुने नागपुरात दरवर्षी किल्ले प्रतिकृती साकारल्या जातात म्हणून संती मंडळाच्या वतीने नागपुरातील प्रसिद्ध दुर्ग अभ्यासक विशाल देवकर व अभिषेक सावरकर यांनी या भव्य रायगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी रायगड ज्याप्रमाणे सजवला गेला होता व महाराजांच्या स्वप्नवत असलेल्या राजधानीचे स्वरूप या किल्ल्यावर अभ्यासपूर्ण सादर करण्यात येत आहे. हा किल्ला साकारायला 15 दिवस लागले असून 13 ट्रक दगड माती लागली आहे. या किल्ल्याचे व प्रदर्शनाचे दर्शन नागपूरकरांना 11 ते 20 नोव्हेंबर पर्यंत रोज सायं. 5 ते रात्री 10 या वेळेत खुले राहणार आहे. या दहा दिवसामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे व विविध स्पर्धांचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे. हिंदुस्थान समाचार
image