Hindusthan Samachar
Banner 2 सोमवार, फरवरी 18, 2019 | समय 05:07 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

लासलगांव महाविद्यालयात विभागीय युवक महोत्सव उत्साहात

By HindusthanSamachar | Publish Date: Oct 13 2018 10:07PM
लासलगांव महाविद्यालयात विभागीय युवक महोत्सव उत्साहात
लासलगाव,दि.१३ आँक्टोबर (हिं.स):- येथील नु.वि.प्र.संस्थेच्या कला,वाणिज्य,व विज्ञान महाविद्यालय व विद्यार्थी विकास मंडळ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय युवक महोत्सव उत्साहात संपन्न झाला. लासलगाव महाविद्यालयाला युवक महोत्सवाचे यजमानपद पहिल्यांदाच मिळाल्याने मोठ्या धुमधडाक्यात आयोजन केले. या सोह्ळयाचे उद्घाटन संस्थेचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव होळकर यांच्या अध्यक्षतेखाली व विद्यार्थी विकास मंडळाचे सहाय्यक कक्षाधिकारी शिवाजी उत्तेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या महोत्सवात नाशिक जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्यातील विविध महाविद्यालयातील सुमारे दिडशे विद्यार्थांनी सहभाग नोंदविला. महोत्सवात शास्रीय गायन,सुगम संगीत, वाद्य संगीत, नृत्य, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व, वाद विवाद, एकांकिका, प्रहसन, मूक नाटक, नकला, चिकटकला ,पोस्टर मेकींग, माती कला, व्यंग चित्रे, रांगोळी, स्थळ छायाचित्रण, इनस्टोलेशन आदी प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. सदर स्पर्धांच्या परीक्षणाचे कार्य विद्यापीठ नियुक्त प्रा.दिपक गरुड,सतीश देशपांडे ,सचिन पवार,सुमुखी अथनी, अक्षता तिखे,तुळशीराम दाभाडे,महेश साळुंके,स्वामीराज भिसे यांनी केले. महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा उपप्राचार्य डॉ.आर.बी.पाटील यांनी घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.दिनेश नाईक, उपप्राचार्य डॉ आदिनाथ मोरे, डॉ.विलास खैरनार,प्रा.सोमनाथ आरोटे ,डॉ.संजय निकम,डॉ.दत्तात्रय घोटेकर,डॉ.संजय शिंदे कमवा व शिका योजनेतील विद्यार्थी, रा.से.यो.तील स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. युवक महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल व महाविद्यालय परिसराबद्दल विद्यापीठाच्या सर्व अतिथींनी गौरोवोद्गार काढले. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
चुनाव 2018
image