Hindusthan Samachar
Banner 2 बुधवार, फरवरी 20, 2019 | समय 19:37 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपिल करणार - मुख्यमंत्री

By HindusthanSamachar | Publish Date: Oct 13 2018 9:30PM
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपिल करणार - मुख्यमंत्री
मुंबई, १३ ऑक्टोबर (हिं.स.) : सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी एमपीएससी मार्फत निवड झालेल्या 833 विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपील करावे, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली. याबाबत सरकार सर्वोच्च न्यायालयात अपील करून या विद्यार्थ्यांना न्याय मिळवुन देईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे मुंडे म्हणाले. एमपीएससी मार्फत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी निवडण्यात आलेल्या 833 उमेदवारांच्या भरतीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाने आव्हान देण्यात आल्याने महाराष्ट्र शासनाची 23 डिसेंबर 2016 ची अधिसुचना न्यायालयाने अमान्य केली होती. त्यामुळे निवड होऊनही या 833 उमेदवारांना नोकरीपासुन वंचित राहावे लागले आहे. याप्रकरणी सरकारने न्यायालयात योग्य भुमिका न मांडल्यानेच या उमेदवारांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली जात होती. यासंदर्भात आज धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेऊन या विद्यार्थ्यांचे म्हणणे त्यांच्यासमोर मांडले व याप्रकरणी मा.सर्वोच्च न्यायालयात चांगला वकील देऊन अपील केल्यास या विद्यार्थ्यांना न्याय मिळु शकतो त्यामुळे तातडीने सरकारने मा.सर्वोच्च न्यायालयात अपील करावे, अशी मागणी मुंडे यांनी केली. यांसदर्भातील मागणीच्या निवेदनावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने कार्यवाही करावी, असे आदेश संबंधित विभागाला दिले असल्याचे मुंडे यांनी सांगितले. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
चुनाव 2018
image