Hindusthan Samachar
Banner 2 सोमवार, फरवरी 18, 2019 | समय 05:58 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

गुन्हे मागे न घेतल्यास मराठा क्रांती मोर्चातर्फे २७ ऑक्टोबरला मंत्रालयाला घेराव

By HindusthanSamachar | Publish Date: Oct 13 2018 9:26PM
गुन्हे मागे न घेतल्यास मराठा क्रांती मोर्चातर्फे २७ ऑक्टोबरला मंत्रालयाला घेराव
मुंबई, १३ ऑक्टोबर (हिं.स.) : मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद नंतर राज्यभरात मराठा तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यातील शेकडो गुन्हे खोटे असल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाने गुन्हे मागे घेण्याची मागणी केली असून ते मागे न घेतल्यास २७ ऑक्टोबर रोजी मंत्रालयाला दुचाकी व चारचाकींचा घेराव घालण्याचा इशारा संघटनेच्या समन्वयकांनी आज पत्रकार परिषदेतून दिला. महाराष्ट्र बंदच्या नियोजनात असलेल्या कार्यकर्त्यांविरोधातही गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. मराठा क्रांती मोर्चातर्फे काढलेल्या मोर्चाच्या नियोजन बैठकीला उपस्थित असलेल्या सोशल मिडियावर तयार करण्यात आलेल्या समुहाचे सदस्य असलेल्या सुशिक्षित तरुणांवरही गुन्हे दाखल केले आहेत. बंद दरम्यान कोणताही हिंसाचार झाला नसताना मागील संदर्भ घेऊन सरसकट गुन्हे दाखल करण्यात आले आहे. असे एकूण ३,५०० गुन्हे दाखल झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार हे गुन्हे मागे घ्यावेत, अन्यथा मंत्रालयाला घेराव घालण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
चुनाव 2018
image