Hindusthan Samachar
Banner 2 बुधवार, फरवरी 20, 2019 | समय 19:09 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

धम्मचक्र प्रवर्तन दिनापूर्वी चिंचोली येथील विकासकामे पूर्ण करून अनुयायांची गैरसोय टाळावी - आ. गजभिये

By HindusthanSamachar | Publish Date: Oct 13 2018 9:08PM
धम्मचक्र प्रवर्तन दिनापूर्वी चिंचोली येथील विकासकामे पूर्ण करून अनुयायांची गैरसोय टाळावी - आ. गजभिये
नागपूर / मुंबई, १३ ऑक्टोबर (हिं.स.) : धम्मचक्र प्रवर्तन दिनाला देशभरातून लाखो अनुयायी पवित्र दीक्षाभूमीला वंदन करण्याकरिता येतात, सोबतच ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेले कपडे, जुते, पेन, टाईपराइट, काठी, चष्मा, टोपी, अश्या अनेक वस्तू ज्या आंबेडकरी जनतेसाठी उर्जास्त्रोत असून प्रेरणादायी आहेत,यांच्या दर्शनासाठी चिचोची येथे येतात, त्यांची गैरसोय होवू नये म्हणून चिंचोली गावातील वस्तूसंग्राहलय शांतीवन येथील दौरा करून प्रत्यक्ष पाहणी करीत उपस्थित अधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. प्रकाश गजभिये यांनी संबंधित कामे त्वरित करण्याच्या सूचना दिल्या. धम्मचक्र प्रवर्तनदिनी देशभरातून आलेले लाखोच्या संख्येतील आंबेडकरी जनता नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीला दर्शनासाठी आल्यावर ते चिंचोली येथील संग्राहलयातील हया वस्तू बघीतल्याशिवाय परत जात नाही. हया वस्तूंचे दर्शन घेतल्यावर ते स्वताला धन्य समजतात. भारतीय संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित शोषित समाजाच्या उध्दारासाठी खर्चीलेला प्रत्येक क्षणाचे साक्षीदार त्यांनी जिवंत असतांना वापरलेले अनेक ऐतिहासिक वस्तू हे चिंचोली गावातील वस्तूसंग्राहलय शांतीवन येथे आहेत. दीक्षाभूमी ते चिंचोली बस सेवा, आंबेडकरी जनतेसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, त्यांचे आरोग्य तपासणी केंद्र, तेथील विजेची व्यवस्था, स्वच्छता, सध्या नागपुरात सुरू असलेले जीवघेणी आजार स्क्रब टायफस, स्वाइन फ्लू, डेंगू आदी संदर्भात डॉक्टरांकडून तपासणी, भिक्खू संघाची राहण्याची सोय, येणाऱ्या अनुयायांची जेवणाची आदी व्यवस्था संदर्भात आ. गजभिये यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
चुनाव 2018
image