Hindusthan Samachar
Banner 2 बुधवार, फरवरी 20, 2019 | समय 19:29 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

रासरंग उत्सवात डिजी ठाणेकरांना भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी

By HindusthanSamachar | Publish Date: Oct 13 2018 9:11PM
रासरंग उत्सवात डिजी ठाणेकरांना भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी
ठाणे, १३ ऑक्टोबर (हिं.स.) : डिजी ठाणे, एमसीएचआय क्रेडाई व इतर संस्थांच्यावतीने ठाणेकरांसाठी ठाणे रासरंग या नवरात्रोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात नागरिकांना सुप्रसिद्ध कलाकारांसोबत सेल्फी काढून गरब्याचा आनंद लुटण्याचा तसेच विविध बक्षिसे जिंकण्याची संधीही या उत्सवात मिळणार आहे. डिजी ठाणे अॅपच्या माध्यमातून एस एम एसद्व्यारे तुमच्या मोबाईलवर प्रश्न विचारण्यात येतील. त्या प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या भाग्यवान विजेत्याला आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे. या संधीचा ठाणेकरांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन डिजी ठाणेच्यावतीने करण्यात आले आहे. ठाण्यातील मॉडेला मिल कंपाऊंड येथे ठाणे रासरंग हा कार्यक्रम आयोजन करण्यात आले असून दिनांक 18ऑक्टोंबर २०१८ पर्यंत हा उत्सव सुरु राहणार आहे. नवरात्री ढोल किंग नैतिक नागडा यांच्या ढोलाच्या साथीत या गरब्याचा आनंद ठाणेकरांना घेता येणार आहे. तसेच विविध बक्षिसेही जिंकण्याची संधी डिजी ठाणेकरांना मिळणार आहे. ‘’डिजी ठाणे’’ हे अॅप डाऊनलोड करून किंवा हे अॅप वापरणाऱ्यांना नवरात्रीचे ९ दिवस रोज सकाळी 9 वाजता एस एम एसद्वारे सामान्य ज्ञान विषयक १ प्रश्नविचारण्यात येणार आहे. ठाणे शहरासंबंधी हे प्रश्न असणार असून नागरिकांना ठाणे शहराची किती माहिती आहे हे त्यातून जाणून घेतले जाणार आहे. प्रत्येक दिवशी या प्रश्नांची योग्य उत्तरे देणाऱ्या 40 भाग्यवान ठाणेकरांना रासरंग उत्सवाचे तिकीटे मोफत दिली जाणार आहेत. सदर प्रश्नांचे उत्तर देण्यास तुम्ही अयशस्वी झाला तरीही डीजी ठाणेचे सदस्य असल्याने तुम्हाला तिकिटात काही प्रमाणात सुट दिली जाणार आहे. तसेच या उत्सवात प्रवेशही तात्काळ मिळेल अशी सुविधा या ठिकाणी करण्यात आली आहे. केवळ तिकीटावर सवलत नाही तर विविध बक्षिसांचीही लयलूट तुम्हाला येथे उत्सवात गरबा खेळता खेळता करता येणार आहे. यासोबतच नवरात्री ढोल किंग नैतिक नगाडा, तसेच उत्सवात सहभागी होणाऱ्या कलाकारांसोबत सेल्फी घेण्याची संधीही काही भाग्यवंतांना मिळणार आहे. तरी या संधीचा ठाणेकरांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन डिजी ठाणेच्यावतीने करण्यात आले आहे. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
चुनाव 2018
image