Hindusthan Samachar
Banner 2 बुधवार, फरवरी 20, 2019 | समय 18:34 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

आखाती, आफ्रिकन देशातील उद्योगांसाठी महाराष्ट्राच्या पर्यटन, उद्योग क्षेत्रात मोठ्या संधी - जयकुमार रावल

By HindusthanSamachar | Publish Date: Oct 13 2018 9:06PM
आखाती, आफ्रिकन देशातील उद्योगांसाठी महाराष्ट्राच्या पर्यटन, उद्योग क्षेत्रात मोठ्या संधी - जयकुमार रावल
दुबई / मुंबई, १३ ऑक्टोबर (हिं.स.) : आखाती, आफ्रिकन देशातील उद्योगांसाठी महाराष्ट्राच्या पर्यटन आणि उद्योग क्षेत्रात मोठ्या संधी आहे. या उद्योग संधीचा उद्योजकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दुबईत शनिवारी केले. गल्फ महाराष्ट्र बिझिनेस फोरमच्या वतीने दुबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 4थ्य आंतरराष्ट्रीय बिझिनेस कॉन्फरन्स महाबिझ 2018चे उदघाटन मंत्री रावल आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी रावल बोलत होते. आखाती आणि आफ्रिकन देशातील सुमारे 500 उद्योजक, महाराष्ट्रातील उद्योजक या परिषदेला उपस्थित होते. आफ्रिकन देश, आखाती देश आणि महाराष्ट्र राज्य यांच्यात एकमेकात पर्यटन, आरोग्य, शिक्षण, सेवा, माध्यम, माहिती तंत्रज्ञान, रियल इस्टेट,व्यापार आदी 10 उद्योग क्षेत्रात कशा रोजगार, उद्योग संधी आहेत, भांडवल वृद्धी आणि कर्ज उभारणीची प्रक्रिया काय आहेत यावर या परिषदेत चर्चा, परिसंवाद झाले.. वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर, तज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी रावल यांनी महाराष्ट्राचे उद्योगक्षेत्रातल्या यशाची उजळणी. महाराष्ट्रच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून झालेल्या महाराष्ट्र समिटमुळे राज्यात 3 लाख ट्रीलीयन डॉलरची गुंतवणूक महाराष्ट्रात आली. देशात एकूण झालेल्या थेट विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राचा वाटा निम्मा आहे हे विशेष... पंतप्रधान मोदींच्यामुळे वर्ल्ड टुरिझम डेचे यजमानपद भारताला मिळाले. वर्ल्ड बँकेच्या टॉप 100 देशात भारताचा समावेश झालाय. रावल पुढे म्हणाले, महाराष्ट्राने उद्योग भरारीत आघाडी घेतलीये... नुकत्याच झालेल्या अरेबियन ट्रॅव्हल मार्टमध्ये इंडो अरब चेम्बर ऑफ कॉमर्सशी मेडिकल आणि वेलनेस टुरिझम हब संदर्भात mou केलाय... पर्यटकांना वेगळं काही हवं असत.. महाराष्ट्रातील बोहरी किचनच्या मुनाफ पटेलसारख्या युवकांनी होम डायनिंग संकल्पना राबवत अल्पावधीत जगातील पर्यटकांना आकर्षित केले आहे... याच धर्तीवर महाराष्ट्रातील कोकणी, सावजी, खान्देशी, वर्हाडी, मालवणी, कोल्हापुरी अशा बहुविध खाद्य संस्कृती होम डायनिंग संकल्पने अंतर्गत जगातल्या पर्यटकांपर्यंत पोहचवयचा पर्यटन मंत्रालयाचा प्रयत्न आहे. पर्यटन उद्योग वाढले तर रोजगार निर्मिती होते. महाराष्ट्रतील प्रगतीच्या संधी सर्वांना उपलब्ध होतील. त्यामुळे आखाती, आफ्रिकन देशातील उद्योगांनी महाराष्ट्रात यावे, सरकार त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करेल, अस आवाहन रावल यांनी केले. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
चुनाव 2018
image