Hindusthan Samachar
Banner 2 सोमवार, फरवरी 18, 2019 | समय 05:14 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

चाळीसगाव येथे ट्रकमधील मार्बलखाली दबून मजूराचा मृत्यू

By HindusthanSamachar | Publish Date: Oct 13 2018 8:57PM
चाळीसगाव येथे ट्रकमधील मार्बलखाली दबून मजूराचा मृत्यू
जळगाव, १३ ऑक्टोंबर (हि.स.) - जिल्ह्यातील चाळीसगाव येथे आणलेल्या बांधकामासाठी आलेल्या ट्रकमधील मार्बलखाली दबून एका ४५ वर्षीय मजूराचा जागीचा मृत्यू झाला आहे. हि घटना शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास धुळे रोड भागात घडली. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहरातील धुळे रोडस्थित बिडे मळा येथे बांधकामाच्या साईडवर ट्रक क्र.आरजे ०९ जीबी ३४७३ मध्ये मार्बल मागविण्यात आले होते. हे मार्बल उतरविण्यासाठी विठ्ठल वाल्मिक गवळी रा.ईच्छा देवी नगर, हे ट्रकमध्ये चढले असता, अचानक मार्बल त्यांच्या अंगावर पडले, यात त्यांचे दोन्ही पाय व गळा मार्बलखाली दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी बघ्याची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. याबाबत चाळीसगाव पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. हिन्दूस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
चुनाव 2018
image