Hindusthan Samachar
Banner 2 गुरुवार, अप्रैल 25, 2019 | समय 22:11 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवणारी टोळी गजाआड

By HindusthanSamachar | Publish Date: Sep 16 2018 8:41PM
स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवणारी टोळी गजाआड
अकोला, १६ सप्टेंबर (हिं.स.) : सोन्याचे बिस्कीट स्वस्तात विक्री साठी असल्याचे आमिष देऊन सोने खरेदीसाठी येणाऱ्या खरेदीदाराला लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने आज दुपारी आळशी प्लॉट येथून गजाआड केले. या टोळीतील पाच जन गुजरातमधील सुरत येथील असून तीन जन अमरावती, जळगाव नंदुरबार येथील असल्याची माहिती समोर आली आहे. खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खंडेलवाल शोरुमजवळ सोन्याचे आमीष देउन लुटमार करणारी टोळी असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांना मिळाली. त्यांनी या टोळीवर पाळत ठेऊन गुजरातमधील सुरत जिल्हयातील विठोबा नगर लिंबाई येथील रहिवासी भिका पाटील, सुरत जिल्हयातील पांढकेश्वर येथील रहिवासी भानुदास ढोडे, सुरत जिल्हयातील गोडदरा येथील रहिवासी राजकुमार नागपात्रे, सुरत येथील एकता नगर सोसायटीमधील जयेश सेंदाने, सुरतमधील गडोदरा नेर येथील रविंद्र पाटील, नंदुरबार येथील रविंद्र नायस्कर, जळगाव खांदेश जिल्हयातील उटखोडा येथील राजु पाटील या सात जनांना ताब्यात घेतले. तर अमरावती येथील रहिवासी निसारभाई फरार होण्यात यशस्वी झाला. या टोळीकडून तलवार, धारदार शस्त्र,रोख सहा हजार रुपये, ७ मोबाईल व एक तवेरा कंपनीचे चारचाकी वाहन असा एकून सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याविरुध्द खदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image