Hindusthan Samachar
Banner 2 गुरुवार, अप्रैल 25, 2019 | समय 03:23 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

गिधाड बचाव मोहिमेला मंडणगड तालुक्यात यश

By HindusthanSamachar | Publish Date: Sep 16 2018 8:37PM
गिधाड बचाव मोहिमेला मंडणगड तालुक्यात यश
रत्नागिरी, १६ सप्टेंबर, (हिं. स.) : चिपळूण येथील सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेच्या गिधाड बचाव मोहिमेला यश आले असून वेसवी (ता. मंडणगड) परिसरात अनेक ठिकाणी गिधाडांचे दर्शन होत आहे. पर्यावरण टिकविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तरीही नामशेष होत चाललेल्या गिधाडांच्या प्रजाती टिकवून ठेवण्यासाठी सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने मंडणगड तालुक्यातील देव्हारे, उमरोली व वेसवी पंचक्रोशीत गिधाडांच्या सुरक्षित आवासाकरिता जनजागृतीची चळवळ राबवली. पक्षिमित्र भाऊ काटदरे यांनी वेळास येथे अनेक वर्षे कासव संवर्धन मोहीम राबवली होती. या मोहिमेच्या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये सागरी कासवांच्या रक्षणासाठी जागृती निर्माण झाल्याने गेल्या चार वर्षांपासून तेथील ग्रामस्थ या मोहिमेचे संचालन करत आहेत. त्यानंतर मंडणगड तालुक्यातील गिधाडांच्या सुरक्षित आवासाकरिता पक्षिमित्र संघटनेने जागृतीचे काम सुरू केले होते. यासाठी स्थानिक ग्रामस्थ व शेतकर्यां्ना माहिती देण्यात आली होती. अभ्यासाअंती देव्हारे पट्ट्यात गिधाडांसाठी सुरक्षित आवासाकरिता योग्य ठिकाणे असल्याचे निष्पन्न झाल्याने या संस्थेने गेल्या काही वर्षांपासून जागृतीचे काम केले आहे. निसर्गचक्र आणि पक्षिजीवनाचा विचार करता गिधाड हा अत्यंत महत्त्वाचा पक्षी आहे. खाद्य मिळत नसल्याने व मोठ्या प्रमाणावर झालेल्या वृक्षतोड़ीमुळे हा पक्षी लोप पावत चाललेला आहे. मेलेल्या गुरांचे मांस हे गिधाडांचे खाद्य आहे. देव्हारे परिसरात विविध आजारांनी गुरे मरण्याचे प्रमाण गेल्या दशकात मंडणगड तालुक्यात सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खाद्यासाठी गिधाडांनी आपला मोर्चा देव्हारे पट्ट्यातील गावांमध्ये वळवला आहे. याचाच परिणाम म्हणून वेसवी येथे रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या जागेत गिधाडांचा कळप आढळून आला आहे. निर्सगचक्र अबाधित राखण्यासाठी गिधाडांचे संवर्धन करणे काळची गरज असल्याने यासंदर्भात या परिसरात जाणीव व जागृतीसाठी कार्य करण्याची अजूनही आवश्यकता आहे, असे मत भाऊ काटदरे यांनी व्यक्त केले. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image