Hindusthan Samachar
Banner 2 गुरुवार, अप्रैल 25, 2019 | समय 03:28 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

कलेमध्ये सत्यासोबत शिव व सौंदर्यही असावे - सरसंघचालक

By HindusthanSamachar | Publish Date: Sep 16 2018 8:08PM
कलेमध्ये सत्यासोबत शिव व सौंदर्यही असावे - सरसंघचालक
मुंबई, १६ सप्टेंबर, (हिं.स) : कलेत सत्यता अनिवार्य असली तरी त्यात शिवाची सात्विकता आणि सौंदर्यही असायला हवे. कलेतील सत्य हे जर पाहणाऱ्याच्या भावना दुखावणारे किंवा मनाला वेदना देणारे असेल तर त्याचा काही उपयोग नाही. नाट्यशास्त्रकार भरतमुनींनीच्या नाटकात युद्धाचे प्रत्यक्ष सादरीकरण न करता त्याचे केवळ वर्णन एका पात्राद्वारे केले जात असे. कोणतीही कला जोपासताना काय करायचे आणि काय टाळायचे याचा विवेक प्रत्येकाने दाखवला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज केले. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या संकल्पनेतून आणि लेखणीतून साकारलेल्या पर्सनालिटीज ऑफ इंडिया या लघु माहितीपट मालिकेचे लोकार्पण सरसंघचालकांच्या हस्ते करण्यात आले. सरसंघचालक पुढे म्हणाले, भारतभर फिरताना असा एकही भाग मला आढळला नाही जिथे स्वातंत्र्यवीर जन्मलेला नाही. देशभरात स्वातंत्र्यासाठी संघर्ष झाला. आजच्या पिढीला संघर्षाचा हा काळ माहिती नसेल पण या स्वातंत्र्यवीरांचे गुण अनुवंशिकतेने त्यांना लाभले आहेत. फक्त या स्वातंत्र्यवीरांची माहिती त्यांना मिळाली पाहिजे. आपण किती जग जिंकले याची कथा पश्चिमेत जगज्जेता कौतुकाने सांगतो. उलट भारतात पित्याच्या वचनासाठी चौदा वर्षे वनवासाला जाणाऱ्या रामाची कथा सांगितली जाते. ही माहिती नव्या पिढीला जावी यासाठी चित्रपट हे उत्तम माध्यम आहे. कारण ही कला मेंदूतून मनात उतरते. पाहणारा तन्मय होतो. फक्त त्याचा उपयोग कसा करायचा याचे भान असले पाहिजे. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले, स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्या अनेक सेनानींच्या वाट्याला पुस्तकांतील फक्त काही परिच्छेद, ओळी आल्या. काहींना डावलले गेले. अनेक व्यक्तींनी आपल्या कार्याच्या माध्यमातून भारताची मान जगात उंचावली आहे. अशांची माहिती नव्या पिढीला व्हावी म्हणून या लघुमाहितीपटांची निर्मिती करण्यात आली आहे. इंडियन इन्फोटेनमेण्ट मीडिया कार्पोरेशनच्या माध्यमातून या १०० लघुपटांची निर्मिती करण्यात आली आहे. भारतातील ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिक, विविध क्षेत्रातील मान्यवरांची माहिती या लघुमाहितीपटाच्या माध्यमातून करून दिली जाणार आहे. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image