Hindusthan Samachar
Banner 2 गुरुवार, अप्रैल 25, 2019 | समय 03:21 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

मुक्त संचार गोठा योजनेचा लाभ घेण्यासाठी २६ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

By HindusthanSamachar | Publish Date: Sep 16 2018 8:09PM
मुक्त संचार गोठा योजनेचा लाभ घेण्यासाठी २६ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
मुंबई / सांगली, १६ सप्टेंबर, (हिं.स.) : जिल्हा परिषद सांगलीच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०१७-१८ मध्ये जिल्हा परिषद स्विय निधीमधून गुराढोरांचा प्रकर्षित विकास अंतर्गत ५० टक्के अनुदानावर मुक्त संचार गोठा तयार करणे ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचे अर्ज तालुक्याच्या ठिकाणी पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांच्या कार्यालयामध्ये उपलब्ध असून अर्ज स्विकारण्याची मुदत २६ सप्टेंबर आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी दिली. या योजनेच्या अर्जाचा नमुना www.sangli.nic.in व www.zpsangli.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. २६ सप्टेंबरनंतर प्राप्त अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image