Hindusthan Samachar
Banner 2 गुरुवार, अप्रैल 25, 2019 | समय 04:02 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

मिनी ट्रॅक्टर वाटप योजनेंतर्गत 21 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत - सचिन कवले

By HindusthanSamachar | Publish Date: Sep 16 2018 8:10PM
मिनी ट्रॅक्टर वाटप योजनेंतर्गत 21 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत - सचिन कवले
मुंबई / सांगली, १६ सप्टेंबर, (हिं.स.) : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील स्वयंसहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने याचा पुरवठा करण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार अनुसूचित जातीच्या बचत गटांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे. शासन निर्णयानुसार लाभाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. सन 2018-19 या आर्थिक वर्षासाठी अनुसूचित जातीच्या बचत गटांनी आवश्यक त्या कागदपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव 21 सप्टेंबरपर्यंत सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी केले आहे. या योजनेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे. अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत, स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती घटकातील असावेत, ज्या लाभार्थ्यांना पॉवर ट्रिलर योजनेमधून यापूर्वी लाभ मिळालेला आहे तसेच अन्य बचत गटात सदस्य आहेत व त्या बचत गटाला यापूर्वी लाभ मिळालेला आहे त्यांना या योजनेचा पुन्हा लाभ घेता येणार नाही. ज्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टरचा लाभ देण्यात आला आहे त्यांना मिनी ट्रॅक्टर विकता येणार नाही. दुबार लाभ घेता येणार नाही अथवा गहाण ठेवता येणार नाही. प्रस्ताव सादर करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे. स्वयंसहाय्यता बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र, स्वयंसहाय्यता बचत गटाच्या नावे असलेल्या बँक पासबुकच्या पहिल्या व शेवटच्या पानाची झेरॉक्स, स्वयंसहाय्यता बचत गटाचा ठराव, स्वयंसहाय्यता बचत गटातील सर्व सदस्यांचा सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेला जातीचा दाखला, स्वयंसहाय्यता बचत गटातील सर्व सभासदांचा तहसिलदार यांचा रहिवासी पुरावा, रेशन कार्ड झेरॉक्स व आधारकार्ड, बचत गटाचे राष्ट्रीयकृत बँकेतील खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांच्या आधार क्रमांकाशी संलग्नचा पुरावा. बचत गटाने ट्रॅक्टर खरेदी करण्याताबत 10 रूपये स्टँम्पवर हमीपत्र. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता इच्छुक बचत गटांनी 21 सप्टेंबरपर्यंत आवश्यक कागदपत्रासह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सांगली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगांव रोड, सांगली येथे प्रस्ताव सादर करावेत. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही कवले यांनी केले आहे. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image