Hindusthan Samachar
Banner 2 सोमवार, फरवरी 18, 2019 | समय 12:37 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

चंद्रपुरात रस्त्यावरील खड्यामुळे तरुणीचा मृत्यू

By HindusthanSamachar | Publish Date: Jul 13 2018 9:48PM
चंद्रपुरात रस्त्यावरील खड्यामुळे तरुणीचा मृत्यू
चंद्रपूर, 13 जुलै (हिं.स.) चंद्रपूर शहरातील वर्दळीच्या बंगाली कॅम्प परिसरात रस्त्यावरील खड्यांमुळे एका १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. काजल पाल असं या दुर्दैवी मुलीचं नाव असून ती बंगाली कॅम्प परिसरातील रहिवासी आहे. यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार काजल पाल ही तरुणी आज, शुक्रवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुम तरुणी दुचाकीने बंगाली कॅम्प कडून सावरकर चौकाकडे जात असतांना रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात खाली पडली.याच वेळी मागून येत असलेल्या ट्रक ने तिला धडक दिली आणि तिचा जागीच मृत्यु झाला. या अपघातानंतर परिसरात मोठा तणाव पसरला असून लोकांनी या भागातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे. पावसाळा सुरु होताच बंगाली कॅम्प परिसरातील रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहे. राजकीय पक्षांनी या बाबत आंदोलन करून देखील हे खड्डे बुजविण्यात आले नसल्याने हा दुर्दैवी अपघात घडल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
चुनाव 2018
image