Hindusthan Samachar
Banner 2 शनिवार, मार्च 23, 2019 | समय 22:36 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

कळसेंनी घेतला अधिवेशनाच्या तयारीचा आढावा

By HindusthanSamachar | Publish Date: Jun 14 2018 10:02PM
कळसेंनी घेतला अधिवेशनाच्या तयारीचा आढावा
नागपूर, 14 जून (हिं.स.)। विधीमंडळ अधिवेशनाच्या तयारीसाठी सर्व विभागाने समन्वयाने काम करून विधीमंडळ अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी केले.महाराष्ट्र विधीमंडळाचे अधिवेशन 4 जुलैपासून विधानभवन, नागपूर येथे सुरु होणार आहे. या अनुषंगाने विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील मंत्रीपरिषद दालन कक्षात विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्व तयारीची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांना मार्गदर्शन करतांना प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे म्हणाले की, शुक्रवार, 22 जून रोजी विधीमंडळाचे कार्यालय विधानभवन, नागपूर येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलीस विभागाने सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवावा. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या जुलै महिन्यात 10 ते12 दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने पोलीस कर्मचाऱ्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे विविध मार्गावर शेड उभारणी करावी अधिवेशन काळात येणाऱ्या मान्यवरांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासव्यवस्था विभागीय प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. परंतु पावसाची परिस्थिती पाहता अतिरिक्त निवास व्यवस्था करण्यात यावी. पावसाळ्यात शॉर्ट सर्किटमुळे आग लागणे किंवा वीज कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात होतात. या घटनेपासून बचावासाठी विधीमंडळ परिसरात आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना डॉ. कळसे यांनी दिल्या. अधिवेशन काळात सर्व मान्यवर तसेच अधिकारी-कर्मचारी, मोर्चेकरी, आंदोलनकारी यांच्या वाहनाच्या पार्किंगची व्यवस्था हिवाळी अधिवेशनाच्या धर्तीवर करण्यात यावी. शहर वाहतुक शाखा व पोलीस विभागाने समन्वय साधून अतिरिक्त पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. याशिवाय मुंबई मुख्यालयावरून येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यासाठी रेल्वे विभागाच्या वतीने अतिरिक्त बोगीची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश संबंधित विभाग प्रमुखांना त्यांनी यावेळी दिले. विधीमंडळात 271 दूरध्वनी संच लावण्यात येणार आहेत. याशिवाय एअर लाईनच्या माध्यमातून अतिरिक्त इंटरनेट सुविधा तसेच दूरध्वनी व्यवस्था करण्यात येणार आहे. विधीमंडळाचे कामकाज ऑनलाईन पद्धतीने चालणार असल्याने पावसाळ्यामुळे दुरध्वनी तसेच इंटरनेट सुविधेत कुठलाही अडथळा राहू नये यासाठी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी खबरदारी घेण्याच्या सूचना विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी यावेळी केल्या. तत्पूर्वी मान्यवरांनी विधानसभा, विधानपरिषद सभागृह तसेच रविभवन, आमदार निवास, 160 खोल्याचे गाळे यांची पाहणी करून उपस्थित अधिकाऱ्यांना तातडीने दुरुस्तीबाबत सूचना केल्यात. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image